मुंबई : मध्य हार्बरसर, मुंबईतील रेल्वेच्या पश्चिम मार्गावरही आज मेगा ब्लॉग घेतला जातोय. तांत्रिक आणि देखभाल दुरुस्तीच्या काही कामांसाठी आज (05 जून 2022) रोजी हार्बर आणि मध्य रेल्वे (Central Railway) चा मेगाब्लॉक (Mumbai Mega Block) घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. नियोजित थांबे घेऊन आपल्या ठरलेल्या स्थानकावर (Station) पंधरा मिनिटे उशिराने पोहोचतील. सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 पर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. नियोजित थांबे घेऊन आपल्या ठरलेल्या स्थानकावर पंधरा मिनिटे उशिराने पोहोचतील.
सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल, बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
Sunday Mega Block (05.06.2022) @drmmumbaicr ? pic.twitter.com/EbWpPaFmFX
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) June 4, 2022
सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत पनवेलहून ठाण्याकडे सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत ठाण्याहून पनवेलकडे सुटणाऱ्या डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी भागावर विशेष लोकल धावतील. म्हणजे प्रवाश्यांना त्रास सहन करण्याची वेळ येणार नाहीये. ब्लॉक कालावधीमध्ये ठाणे वाशी, नेरूळ दरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावरील उपनगरीय सेवा सुरू राहतील. तसेच बेलापूर नेरूळ आणि खारकोपर दरम्यान उपनगरीय सेवा सुरू राहतील.
Mumbai
Railway Megablock
5th June 2022 pic.twitter.com/twYSsHtKYX— Subhash G Rail Yatri Parishad (@yatrisangh) June 4, 2022
रविवार असल्यामुळे लोकलला गर्दी कमी असते. शिवाय मुंबईमधील अनेक आॅफिस बंद असल्यामुळे नोकरदार वर्गाला मेगाब्लाॅकचा काही विशेष परिणाम पडणार नाहीये.
पोईसर येथील पुलाच्या कामासाठी पश्चिम रेल्वेमार्गावर जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येतोय. शनिवारी रात्री 11 वाजल्यापासून हा ब्लॉक सुरु करण्यात आला. रविवारी 1.30 वाजेपर्यंत हा जम्बो ब्लॉक घेण्यात येईल. या काळात बोरीवली ते गोरेगाव दरम्यान, धावणाऱ्या सर्व फास्ट लोकल या स्लो ट्रॅकवरुन चालवण्यात येणार आहेत.