मुंबई : मध्य रेल्वेने (Central Railway), पश्चिम रेल्वे अन् हर्बल रेल्वेने रविवारी विविध कामांसाठी मेगाब्लॉक (Mega Block) घोषित केला आहे. या मेगाब्लॉकमुळे काही मार्गावरील लोकल (Local) रद्द करण्यात आल्या आहेत. काही लोकल उशिराने धावणार आहेत. तसेच काही एक्स्प्रेस गाड्याही रद्द केल्या आहेत. यामुळे आज रविवारच्या सुट्टीच्या दिवशी कुठे फिरण्यासाठी बाहेर जात असाल, तर सर्वात आधी मुंबई लोकलचं वेळापत्रक जाणून घ्या.त्यानंतरच आपले नियोजन करा.
ठाणे ते कल्याण पाचवा-सहावा मार्ग आणि कुर्ला ते वाशी या मार्गावर मध्य रेल्वेने रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉक कालावधीत हार्बर लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. प्रगती एक्स्प्रेससह अन्य मेल-एक्स्प्रेस विलंबाने धावणार आहेत.काही एक्स्प्रेस रद्दही केल्या आहेत. तसेच पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते भाईंदरदरम्यान रात्रकालीन ब्लॉक असल्याने पश्चिम रेल्वेवर दिवसा ब्लॉक असणार नाही.
मध्य रेल्वे –
स्थानक : ठाणे – कल्याण
मार्ग : पाचवा आणि सहावा
वेळ : सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत
हार्बर रेल्वे –
स्थानक : कुर्ला – वाशी
मार्ग : अप आणि डाऊन
वेळ : सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१०पर्यंत
पश्चिम रेल्वे : सकाळी ब्लाॅक नाही
स्थानक : बोरिवली ते भाईंदर
मार्ग : अप आणि डाऊन जलद
वेळ : शनिवार रात्री ११.४५ ते रविवार पहाटे ४.४५ संपणार
या गाड्या रद्द
नागपूर-अहमदाबाद, मुंबई भुसावळ आणि सुरत-अमरावती एक्स्प्रेस आज रद्द करण्यात आली आहे.
उधना रेल्वे स्टेशनवर मेगा ब्लॉक
सुरतजवळील उधना रेल्वे स्टेशनवर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रातून सुरतकडे जाणाऱ्या गाड्यांवर परिणाम झाला आहे. ३ ते ६ मार्च दरम्यान या गाड्या रद्द आहेत. यामुळे प्रवाश्यांनी प्रवास करण्यापूर्वी चौकशी करुन नियोजन करावे.