रविवारी 14 एप्रिल रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, अनुयायींचे हाल होणार?

| Updated on: Apr 13, 2024 | 3:05 PM

14 एप्रिल रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांना त्रास सहन करावा लागू शकतो. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे तिन्ही मार्गावर ब्लॉक असल्याने काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळेत गर्दी होण्याची शक्यता आहे.

रविवारी 14 एप्रिल रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, अनुयायींचे हाल होणार?
mumbai railway megablock
Follow us on

मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मार्गांवर रविवारी दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी १४ एप्रिल रोजी हा ब्लॉक असल्याने प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

ठाणे – कल्याण अप आणि धिम्या मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ठाणे – कल्याण दरम्यानची अप आणि धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. या लोकल डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे या स्थानकांत थांबतील.

हार्बर मार्गावर विशेष लोकल

हार्बर मार्गावर देखील मेगाब्लॉक असणार आहे. कुर्ला – वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत सीएसएमटी – पनवेल, बेलापूर, वाशी लोकल रद्द असणार आहेत. सीएसएमटी – कुर्ला आणि पनवेल – वाशी दरम्यान विशेष लोकल धावणार आहेत.

पश्चिम रेल्वेवर काही लोकल रद्द

पश्चिम रेल्वेवर बोरिवली – गोरेगाव जलद मार्गावर  सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत काही लोकल रद्द केल्या आहेत.

उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने दादर चैत्यभूमीवर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दरम्यान दादरला येणाऱ्या लोकांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो.