सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंक माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्ग
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.44 या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा माटुंगा येथे धीम्या मार्गावर वळवल्या जातील, (local megablock) माटुंगा आणि मुलुंड दरम्यान त्यांच्या नियोजित स्थानकांवर थांबतील. ठाण्याच्या पलीकडे असलेल्या जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन फास्ट मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि त्या नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्याहून सकाळी 10.46 ते दुपारी 3.26 वाजेपर्यंत अप जलद सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येईल, मुलुंड आणि माटुंगा दरम्यान त्यांच्या नियोजित स्थानकांवर थांबेल. पुढे, या अप जलद सेवा माटुंगा येथे अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिरा पोहोचतील.
हार्बर लाईन
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे.सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे/गोरेगाव येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 वाजेपर्यंत डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सकाळी 9.53 ते दुपारी3.20 पर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीहून सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रेहून सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 8) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे. रेल्वेने पत्रकात तशी माहिती दिली आहे.