मुंबई : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र महिला अधिकारी दीपाली चव्हाण यांनी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केलीय. आत्महत्येपूर्वी दीपाली चव्हाण यांनी एक सुसाईट नोट लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी DFO विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचं पाऊल उचलत असल्याचं चव्हाण यांनी म्हटलंय. दीपाली यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर मुख्य प्रधान सरंक्षक रेड्डी यांच्या नावे ही सुसाईड नोट लिहिण्यात आली आहे. यात वरिष्ठ अधिकारी DFO विनोद शिवकुमार यांनी मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर अखेर DFO विनोद शिवकुमार यांच्यावर धारणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(After the suicide of RFO Deepali Chavan, what has happened so far in this case?)
RFO दीपाली चव्हाण यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोपाखाली DFO विनोद शिवकुमार यांच्यावर धारणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याता आला. त्यानंतर शिवकुमार यांच्या अटकेसाठी पोलिसांनी नाकाबंदी केली. अखेर नागपूर रेल्वे स्टेशनवरुन शिवकुमार यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर वनविभागाचे प्रधान सचिव दर्जाचे दोन अधिकारी व्ही. साईप्रकाश आणि नितीन काकोडकर हे अमरावतीत दाखल झाले आहेत. त्याचबरोबर फॉरेस्ट रेंजर असोसिएशनचे पदाधिकारीही मोठ्या संख्येनं अमरावतीत दाखल झाले आहेत. यावेळी APCCF श्रीनिवास रेड्डी यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
RFO दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर आता भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. दिपाली चव्हाण यांना अपमानित करण्यात आले. भ्रष्ट व्यवस्थेने त्यांचा बळी घेतला, असा हल्लाबोल भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला. चित्रा वाघ यांनी शुक्रवारी ट्विट करुन यासंदर्भात भाष्य केले. लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरीसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण हिचा भ्रष्ट व्यवस्थेने बळी घेतला. विविध पद्धतीने तिला त्रास देण्यात आला ज्याचा सविस्तर उल्लेख तिच्या पत्रात आहे हरामखोर DCF शिवकुमार याने तिच्या एकटेपणाचा फायदा घेण्याचा ही प्रयत्न केला, तिला अपमानित केल जात होतं, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
Sexual Harresment at work place हा “विशाखा क़ायदा”राज्याच्या वनमंत्रालयाला लागू आहे की नाही
RFO दिपाली चव्हाण हिने DCF शिवकुमार विरोधात केलेली तक्रार वनसंरक्षक रेड्डी यांनी विशाखातंर्गत ICC कमिटीत का दाखल करून घेतली नाही
क़ायदे फक्त कागदावरच ठेवायचे असतील तर काडी लावा त्यांना
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 26, 2021
खासदार नवनीत राणा यांनी दिपाली चव्हाण यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले नसते तर दीपाली चव्हाण यांच्यासारख्या कार्यक्षम अधिकाऱ्याचा जीव वाचला असता, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी केले. दीपाली चव्हाण यांनी स्थानिक खासदार नवनीत राणा यांच्याकडे दाद मागितली होती. तेव्हा खासदारांनी आवाज उठवायला हवा होता. कदाचित वेळीच आवाज उठवला असता तर एक कार्यक्षम अधिकाऱ्याचा जीव आपण वाचवू शकलो असतो, असे चाकणकर यांनी म्हटले.
दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी दीपाली चव्हाण यांच्या सुसाईड नोटमधील माहितीचा दाखला देत नवनीत राणा यांना कोंडीत पकडले आहे. तक्रार करुनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या खासदार नवनीत राणा या हत्येत अप्रत्यक्ष सहभागी आहेत का, असा सवाल रुपाली चाकणकर यांनी उपस्थित केला.
सदर माहिती जेव्हा दीपाली चव्हाण यांनी स्थानिक खासदार नवनीत कौर राणा यांच्या कानावर घातली तेव्हा खासदारांनी आवाज उठवायला हवा होता. कदाचित वेळीच आवाज उठवला असता तर एक कार्यक्षम अधिकाऱ्याचा जीव आपण वाचवू शकलो असतो.@TV9Marathi @saamTVnews @abpmajhatv @MiLOKMAT @LoksattaLive pic.twitter.com/nGMZ7FiKFg
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) March 26, 2021
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर मुख्य प्रधान सरंक्षक रेड्डी यांच्या नावे लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये दीपाली चव्हाण यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. त्यात खालील आरोपांचा समावेश आहे.
>> ऑक्टोबर २०२०मध्ये आपण आमझरी दौऱ्यावर असताना प्रेग्नंसीमुळे मी ट्रेक करु शकत नव्हते. याबाबत मी पियूषा मॅडमला सांगितले आणि घरी निघून गेले. पण यानंतर सलग तीन दिवस मला भाकूरमध्ये कच्च्या रस्त्यातून फिरवण्यात आले. त्यामुळे माझा गर्भपात झाला. पण त्यातसुद्धा मला सुट्टी दिली नाही. माझे सासर अमरावतीत आहे. पण महिन्यातून एकदाही मला घरी जाता येत नाही.
>> रात्री बेरात्री कुठेही भेटायला बोलवतात. अश्लील भाषेत बोलतात. मी याआधीही तुमच्याकडे तक्रार केली होती. पण तुम्ही तुमच्या अधिकाऱ्याची बाजू घेणार हे मला माहिती होती. त्यामुळे मी माझ्याच बदलीचा विचार करत होते. मेळघाट ही अशी दलदल आहे जिथे आम्ही आमच्या मर्जीने येऊ तर शकतो पण तुमच्या मर्जीशिवाय बाहेर जाऊ शक नाही. याच दलदलीत मी अडकत चालले आहे.
>> माझ्या रेंजमधील सर्व काम करुनही मला अद्याप याचे पैसे मिळाले नाहीत. मी मेडिकलवरुन कामावर रुजू होत नव्हते पण तुमच्यामुळे रुजू झाले. त्यावेळी तुम्ही त्यांच्याशी बोलाल असे आश्वासन दिले होते. पण त्यांच्या वागण्यात काहीही बदल झाला नाही. उलट दिवसेंदिवस त्यांचा माझ्यावरचा राग वाढत चालला असल्याचे दीपाली चव्हाण यांनी पत्रात म्हटले होते.
संबंधित बातम्या :
साताऱ्याची दीपाली, मेळघाटात वनअधिकारी, स्वत:वर गोळी झाडली, हादरवणारी सुसाईड नोट जशीच्या तशी
After the suicide of RFO Deepali Chavan, what has happened so far in this case?