मुंबई : युनायटेड किंगडम शासनाच्या फॉरेन कॉमनवेल्थ अँड डेव्हलमेंट ऑफिस (एफसीडीओ) आणि महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांच्यामध्ये आज सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात स्वच्छ तथा हरीत उर्जा क्षेत्रातील स्टार्टअप्सना मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येणार आहे. करार करतेवेळी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक आणि पश्चिम भारताचे ब्रिटीश डेप्युटी हायकमिशनर ॲलन गेमेल उपस्थित होते. (Memorandum of Understanding between UK FCDO and State of Maharashtra will give a boost to startups in the green energy sector)
ऑनलाईन पार पडलेल्या या कार्यक्रमास कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, एफसीडीओच्या उपसंचालक कॅरन मॅकलुस्की आदी मान्यवर उपस्थित होते.
ॲक्ट फॉर ग्रीन (Act4Green) कार्यक्रमांतर्गत हरीत उर्जा क्षेत्रातील स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यात येत आहे. याअंतर्गत युके आणि भारतातील हरीत उर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या निवडलेल्या 24 स्टार्टअप्सना विकसित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, विकसित स्टार्टअप्सना जागतिक बाजारपेठेच्या संधी देणे, त्यांना गुंतवणुकदारांसमोर सादरीकरणाची संधी उपलब्ध करुन देणे, राज्यात कार्यरत असलेल्या इन्क्युबेशन सेंटर्सच्या माध्यमातून मार्गदर्शन करणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. एफसीडीओ आणि राज्य नाविन्यता सोसायटी यांच्या संयुक्त प्रयत्नातून या क्षेत्रातील स्टार्टअप्सना विशेष मदत करण्यात येणार आहे.
I believe it is a great opportunity for Maharashtra State Innovation Society (MSinS) to work alongside the Foreign commonwealth and development office (FCDO, UK govt) on this ‘Act4Green’ initiative to support Indian and UK based startups from the clean technology sector.
(3/4)— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) June 24, 2021
मंत्री नवाब मलिक म्हणाले की, पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने हरीत उर्जेला प्रोत्साहन देणे गरजेचे झाले आहे. ॲक्ट फॉर ग्रीन कार्यक्रमांतर्गत यासाठी चालना देण्यात येत आहे. राज्यातील अनेक तरुण नवनवीन संकल्पना पुढे आणून स्टार्टअप्स विकसित करत आहेत. हरीत उर्जा क्षेत्रातही अनेक जण काम करीत आहेत. आज झालेल्या सामंजस्य करारामुळे हरीत उर्जा क्षेत्रातील तंत्रज्ञान विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
(2/2) The agreement signed by @dskushwah_singh and @KarenMcluskie will benefit innovative start-ups that are addressing #climatechange challenges to drive sustainable economic growth in UK?? and India?? #TogetherForOurPlanet
— UK in Mumbai ???? (@UKinMumbai) June 24, 2021
ब्रिटीश डेप्युटी हायकमिशनर गेमेल म्हणाले की, युके आणि भारतामध्ये मैत्रीचे संबंध दिर्घकाळापासून आहेत. वातावरणीय बदलांचा सामना करण्यासाठी दोन्ही देश एकत्रितरित्या काम करीत आहेत. आज झालेल्या सामंजस्य करारातून हे काम अधिक गतीने पुढे जाऊ शकेल. युके आणि महाराष्ट्र राज्यामार्फत हरीत उर्जा क्षेत्रातील नवनवीन संकल्पना, संशोधन, स्टार्टअप्सना चालना देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
Today @MSInSociety signed an MoU with @UKinIndia for ‘Act4Green’ Program in the presence of Hon’ble Cabinet Minister Shri @nawabmalikncp & British Deputy High Commissioner for Western India @alangemmell. (1/3) https://t.co/kh1zmNqtoR pic.twitter.com/LqNOKp40Je
— Innovation Society (@MSInSociety) June 24, 2021
इतर बातम्या
मनसेच्या एकमेव आमदाराची भूमिका राज ठाकरेंच्याविरोधात? बघा काय म्हणतात राजू पाटील?
(Memorandum of Understanding between UK FCDO and State of Maharashtra will give a boost to startups in the green energy sector)