मिरा-भायंदर : भायंदरच्या उत्तन परिसरातील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे (High Profile Sex Racket Exposed). दलाल महिलांकडून ग्राहकांना मॉडेल मुलींचा पुरवठा करण्यात येत होता. पोलिसांनी सापळा रचून दोन दलाल आरोपी महिलांना अटक केली आहे. तसेच, चार पीडित मुलींची सुटकाही करण्यात आली. यापैकी दोघी या मॉडेल आहेत (High Profile Sex Racket Exposed).
मिरा-भायंदर, वसई-विरार आयुक्तालय परिमंडळ-1 चे उपायुक्त अमित काळे यांना माहिती मिळाली की, काही दलाल महिलांकडून वेश्या व्यवसायासाठी मॉडेल मुलींचा पुरवठा करण्यात येत आहे. या माहितीनुसार, उपायुक्त अमित काळे यांनी बोगस ग्राहक तयार करुन दलाल महिलांकडून मॉडेल मुलींची मागणी केली.
वेश्या व्यवसायसाठी दोन लाख रुपयांमध्ये करार झाल्यावर उत्तन परीसरातील धावकी या ठिकाणी त्यांना बोलावण्यात आले. पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी नयानगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांचा नेतृत्वखाली एक स्पेशल टीम तयार केली.
दलाल महिला दोन मॉडेलसह चार मुलींना दोन गाड्यांमध्ये घेवून उत्तन सागरीय पोलीस ठाणे हद्दीतील धावगी यापरिसरातील आल्या. त्याचवेळी पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांच्या टीमने दोन दलाल माहिला आणि चार पीडित मुलींना ताब्यात घेतलं. त्यांची विचारपुस केली असता त्यांनी हा सर्व प्रकार उघडकीस आला आणि दलाल महिलांनीही त्यांचा गुन्हा कबुल केला.
आरोपी महिलांवर भारतीय दंड संहिता 370, 34 आणि पिटा कायदा 4, 5 अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. तसेच चार पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती उत्तन सागरीय पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली.
मुंबईत तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, दोघांना 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाhttps://t.co/iOzvsLsc1S#MumbaiCrime #CrimeNews #Molestation
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 8, 2020
High Profile Sex Racket Exposed
संबंधित बातम्या :
फेसबुकवरची ओळख पडली महागात; व्यापाऱ्याला 30 लाखाला गंडा, दापोली पोलिसात तक्रार
धक्कादायक… छत्तीसगडमध्ये नववीतील विद्यार्थिनीवर 13 दिवस आठ जणांकडून सामूहिक बलात्कार
मोबाईलला नेटवर्क नसल्याने घराबाहेर आलेल्या अल्पवयीन तरुणीवर बलात्कार, दोन जणांवर गुन्हा