मुंबई महापालिकेसाठी रिपाइंचं ‘मिशन 55’, रामदास आठवलेंचे कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश

| Updated on: Jul 09, 2021 | 4:36 PM

पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या (2022 Brihanmumbai Municipal Corporation election) तयारीला रिपब्लिकन पक्षाने जोरदार सुरुवात केली आहे.

मुंबई महापालिकेसाठी रिपाइंचं मिशन 55, रामदास आठवलेंचे कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश
Ramdas Athawale
Follow us on

मुंबई : पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला रिपब्लिकन पक्षाने जोरदार सुरुवात केली आहे. आज वांद्रे पूर्व येथील मुंबई मनपाच्या वॉर्ड क्र 93 च्या रिपब्लिकन पक्षाच्या जन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. (Mission 55 : Ramdas Athawale Republican Party of India is ready for BMC election 2022)

रिपब्लिकन पक्षाच्या रोजगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष अमित तांबे यांच्या पुढाकारातून वॉर्ड क्र. 93 मध्ये रिपाइंच्या जन संपर्क कार्यालयाची उभारणी करण्यात आली आहे. या कार्यालयातून स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळवून द्यावा, रोजगार आणि करियर मार्गदर्शन करावे, तसेच स्थानिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे जन संपर्क कार्यालय सर्वांसाठी खुले राहावे, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.

रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांच्या पुढाकारातून मुंबई महापालिका निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी सांताक्रूझ भीमछाया सांस्कृतिक केंद्र येथे यापूर्वी बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून मुंबई महापालिका निवडणुकीत किमान 55 वॉर्ड जिंकण्याची तयारी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार विभागाविभागात रिपाइं कार्यकर्ते तयारीला लागले आहेत.

वांद्रे वॉर्ड क्र 93 येथे रिपाइंचे कार्यकर्ते अमित तांबे यांनी जनसंपर्क कार्यालय उभारून आपल्या इच्छूक उमेदवारीची गुढी उभारली आहे. रामदास आठवले यांच्या हास्ते जन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

उद्घाटन कार्यक्रमावेळी रिपाइं रोजगार जिल्हाध्यक्ष विवेक पवार, जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कासारे, मुस्तक बाबा रोजगार आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष चंदू जगताप, सचिन कासारे, घनश्याम चिरणकर, संजय खंडागळे, संतोष बिरवाडकर उपस्थित होते.

हे ही वाचा

एकनाथ खडसेंची पत्नी मंदाकिनींनाही ईडीचे समन्स, जावयाच्या अटकेनंतर सासू-सासरे रडारवर

“जावयापाठोपाठ एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसेंनाही अटकेची शक्यता”

“ईडी बोलावेल तेवढ्या वेळा हजर राहू”, अटक टाळण्यासाठी एकनाथ खडसे यांचं आश्वासन?

(Mission 55 : Ramdas Athawale Republican Party of India is ready for BMC election 2022)