मुंबई: राज्यात गेल्या सहा महिन्यात जवळपास 40 एसटी कामगारांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्यांना राज्यातील रक्तपिपासून आघाडी सरकराच जबाबदार आहे, असा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. आशिष शेलार यांनी आंदोलक एसटी कामगाारांची आझाद मैदानात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी ही टीका केली.
एसटी कामगारांशी गुमान चर्चा करा, सोपा मार्ग काढा, सरळ विलनीकरण करा त्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करा. 40 जणांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेलं हे सरकार रक्तपिपासू असल्याची घणाघाती टीका शेलार यांनी यावेळी केली. एसटीचे राज्य शासनात विलनीकरण, सहावा वेतन आयोगासह इतर मागण्यांसाठी या कामगारांचे आंदोलन सुरू आहे. या मागण्या मान्य करा आणि एसटी कामगार जगवा, असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते.
शासकीय कर्मचाऱ्यांना जे फायदे मिळतात, ओळख मिळते ती द्या. एवढीच कामगारांची मागणी आहे. यासाठी केवळ एक वाक्याचा जीआर काढायचा आहे. राज्य सरकारला सर्व सहकार्य करु. पण नाही केलत तर आम्ही परत येतोय हे लक्षात ठेवा. ही लढाई केवळ एसटी कामगारांची नाही तर महाराष्ट्रातल्या गोरगरिब, दलित, पिडित, वंचित समाजाला न्याय देण्याची लढाई आहे, असं त्यांनी सांगितलं.
आझाद मैदानासमोर मुंबई महापालिका आहे. जिथे 80 हजार कोटींचे फिक्स डिपॅाझिट आहेत. पण इथे मराठी माणूस आंदोलन करतोय, त्यांना लाईट आणि पाण्याची ही सुविधा दिली जात नाही. या सत्ताधाऱ्यांना लाज कशी वाटत नाही? असा सवालही त्यांनी केला. उद्या यासाठी महानगरपालिका आयुक्तांची यासाठी भेट घेणार असल्याच ही ते म्हणाले.
मायावी राक्षसासारख हे सरकार शब्दांत सामान्यांना भुलवत आहे. यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. काळीज नसलेलं हे सरकार आहे. मंत्री म्हणतात, एसटी रक्तवाहिनी आहे. मग तुम्ही आता रक्तपिपासू का बनलात? असा सवाल त्यांनी यावेळी केला. 40 जणांचे बळी तुम्ही घेतलेत अशी टीका त्यांनी केली.
संबंधित बातम्या:
VIDEO: कंगना रणावत खरी बोलली, स्वातंत्र्य भिकेत मिळालंय; विक्रम गोखलेंकडून कंगनाचं समर्थन