आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नीची राजकारणात “एन्ट्री”, सरळ कल्याण लोकसभेचा दावा?

| Updated on: Mar 12, 2024 | 10:30 AM

ganpat gaikwad firing | गोळीबार प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणातील आरोपी त्यांचा मुलगा वैभव गायकवाड फरार आहे. तर दुसरीकडे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नीची राजकारणात एन्ट्री, सरळ कल्याण लोकसभेचा दावा?
सुलभा गायकवाड, कल्याण
Follow us on

सुनील जाधव, कल्याण | दि. 12 मार्च 2024 : उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात शिवसेना पदाधिकारी महेश गायकवाड याच्यावर गोळीबार प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणातील आरोपी त्यांचा मुलगा वैभव गायकवाड फरार आहे. तर दुसरीकडे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. कल्याण लोकसभा मतदार संघात आमदार गणपत गायकवाड याची पत्नी सुलभाताई गायकवाड यांनी शक्ती प्रदर्शन केले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

जेसीपीच्या साह्याने फुलांची उधळण

शिंदे गटाचे कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या चिंचपाडा परिसरातील जनसंपर्क कार्यालयाबाहेर विकास कामाचे भूमीपूजन करत सुलभाताई गायकवाड यांनी शक्ती प्रदर्शन केले. यावेळी भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवाशांकडून गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभाताई गायकवाड यांचे जेसीपीच्या साह्याने फुलांची उधळण करत फटाके वाजवून जल्लोषात स्वागत करण्यात आले.

भाजप कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी

शिंदे गट शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड तळोजा कारागृहात आहेत. गोळीबाराच्या घटनेनंतर कल्याण पूर्व मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम तयार झाला होता. मात्र भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गणपत गायकवाड या मैदानात उतरल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील आमदार गायकवाड यांच्या निधीतून मंजूर विविध विकासकामांचे भूमिपूजन सुलभा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

यापूर्वी झाली बॅनरबाजी

कल्याण कोळशेवाडी परिसरात भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्याकडून बॅनरबाजी झाली होती. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व्हिसीद्वारे अनावरण झाले होते. त्यावेळी कल्याण पूर्व परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करत शक्ती प्रदर्शन करण्यात आले. आमदार गणपत काळू गायकवाड यांच्यासह तमाम जनतेने पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले. माननीय आमदार गणपत गायकवाड यांनी केलेला पाठपुरावा असा आशयाचे बॅनर लागले होते.