Maharashtra MLC Election 2021: विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी निवडणूक जाहीर, सतेज पाटील यांच्यासह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

| Updated on: Nov 09, 2021 | 2:02 PM

भारतीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

Maharashtra MLC Election 2021: विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी निवडणूक जाहीर, सतेज पाटील यांच्यासह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
ELECTION
Follow us on

नवी दिल्ली: भारतीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. विधानपरिषदेच्या एकूण 8 जागांचा कार्यकाळ संपुष्ठात येत असला तरी सोलापूर आणि अहमदनगर वगळता मुंबईतील 2, कोल्हापूर, धुळे नंदुरबार, अकोला बुलडाणा वाशिम, नागपूर, या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. रामदास कदम, भाई जगताप, सतेज पाटील, अमरिश पटेल, गिरीश व्यास, गोपालकिशन बाजोरिया यांच्या जागांवर निवडणूक होणार आहे.

निवडणूक कार्यक्रम

अधिसूचना जाहीर : 16 नोव्हेंबर
अर्ज दाखल करण्याचा दिनाक: 23 नोव्हेंबर
अर्जांची छाननी: 24 नोव्हेंबर
अर्ज मागे घेण्याची मुदत: 26 नोव्हेंबर
मतदान : 10 डिसेंबर (सकाळी 8 ते 4)
मतमोजणी : 14 डिसेंबर
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक: 16 नोव्हेंबर

दिग्गज उमेदवार मैदानात

स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील मुंबईतील 2, कोल्हापूर, धुळे नंदुरबार, अकोला बुलडाणा वाशिम, नागपूर, या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.मुंबईतून रामदास कदम आणि भाई जगताप, कोल्हापूरमधून सतेज पाटील, धुळे नंदूरबार अमरिश पटेल, नागपूरमधून गिरीश व्यास, अकोला बुलडाणा वाशिममधील गोपालकिशन बाजोरिया यांचा सहा वर्षांचा कालावधी संपत आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानं देगलूर बिलोली निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर विधानपरिषद निवडणुकीचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे.

महाविकास आघाडीचा कस लागणार?

भारतीय निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या सहा जागांपैकी रामदास कदम यांची जागा टिकवणं शिवसेनेसाठी महत्वाचं आहे. रामदास कदम यांना शिवसेना संधी देणार का हे पाहावं लागणार आहे. रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील तो निर्णय मान्य असेल,असं म्हटलं आहे. तर, मुंबईतील काँग्रेसची भाई कदम यांची जागा देखील काँग्रेससाठी महत्त्वाची ठरणार आहे. भाई जगताप हे सध्या मुंबई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असल्यानं त्यांना काँग्रेस पुन्हा संधी देणार का हे पाहावं लागणार आहे. तर, धुळे नंदुरबारमध्ये भाजपचे अमरिश पटेल यांचं एकहाती वर्चस्व असल्यानं भाजप त्यांना पुन्हा संधी देण्याची शक्यता आहे.

सतेज पाटील यांना भाजप कडवं आव्हान देणार?

काँग्रेस नेते आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्था मतदासंघातून विजयी झाले होते. आता ते मंत्री असल्यानं त्यांना देखील विजय मिळवणं गरजेचे झालं आहे. तर, दुसरीकडं भाजप त्यांना तगडं आव्हान देण्याची शक्यता आहे. नागपूर मतदारसंघातून भाजप गिरीश व्यास यांच्याऐवजी दुसऱ्या उमदेवाराला संधी देण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या:

‘अनिल देशमुखांचा बळी दिला जातोय, राजा आणि वजीर पुढे येत नाहीत’, प्रकाश आंबेडकरांचा इशारा नेमका कुणाकडे?

1993 बॉम्बस्फोट कनेक्शन, फडणवीसांनी उल्लेख केलेला सरदार शाह वली खान कोण आहे?

 

MLC Election 2021 Schedule for Maharashtra States Including Ahmednagar Mumbai Kolhapur Nagpur Dhule Nandurbar released by Election Commission of India