VIDEO : मॉलमध्ये समोस्यात कपडा आढळला, मनसे कार्यकर्त्यांकडून कर्मचाऱ्याला मारहाण

| Updated on: Jul 05, 2019 | 3:46 PM

कल्याण : कल्याणमधील सर्वोदय मॉलमधील एसएम 5 थिएटरमध्ये समोस्यामध्ये कपड्याचा तुकडा आढळला. सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्या तरुणीने 90 रुपयांचा समोसा खरेदी केला. या समोस्यात कपड्याचा तुकडा आढळला. यासंदर्बात मॉल प्रशासनाला जाब विचारायला गेलेल्या मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली. या घटनेनंतर तरुणीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधला. त्यानंतर मनसेच्या कल्याण महिला शहराध्यक्ष शीतल विखनकर आणि मनसेच्या […]

VIDEO : मॉलमध्ये समोस्यात कपडा आढळला, मनसे कार्यकर्त्यांकडून कर्मचाऱ्याला मारहाण
Follow us on

कल्याण : कल्याणमधील सर्वोदय मॉलमधील एसएम 5 थिएटरमध्ये समोस्यामध्ये कपड्याचा तुकडा आढळला. सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्या तरुणीने 90 रुपयांचा समोसा खरेदी केला. या समोस्यात कपड्याचा तुकडा आढळला. यासंदर्बात मॉल प्रशासनाला जाब विचारायला गेलेल्या मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली.

या घटनेनंतर तरुणीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधला. त्यानंतर मनसेच्या कल्याण महिला शहराध्यक्ष शीतल विखनकर आणि मनसेच्या इतर महिला पदाधिकारी सर्वोदय मॉलमधील थिएटरमध्ये दाखल झाल्या. मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मॉल प्रशासनाला यासंदर्भात जाब विचारला.

मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सर्वोदय मॉलमध्ये जाऊन थिएटरमधील कर्मचाऱ्यांना जाब विचारताना मारहाणही केली. शिवाय, एका कर्मचाऱ्यांला कपडा आढळलेला समोसा खाण्यासही सांगितला. त्यामुळे थिएटरबाहेर काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.

दरम्यान, मॉलमध्ये अन्नपदार्थ अत्यंत महागड्या किंमतीत विकलं जातं. त्यामुळे एकीकडे महागडे अन्नपदार्थ आणि दुसरीकडे त्याच अन्नपदार्थांमध्ये कपडे किंवा इतर गोष्टी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. एकंदरीत मॉलमधील निकृष्ट अन्नपदार्थांच्या माध्यमातून ग्राहकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे, अशी तक्रार आता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.