‘शाळेची फी कमी करणार, प्रत्येक मुलाला चांगल्या पगाराची नोकरी’, मनसेच्या गजानन काळे यांचा बॉण्ड पेपरवर शब्द

| Updated on: Nov 03, 2024 | 4:55 PM

बेलापूर विधानसभा मतदारसंघात मनसे नेते गजानन काळे यांनी 500 रुपयांच्या दोन बॉण्ड पेपर्सवर मुलांच्या शिक्षणाची फी कमी करणार, तरुणांना चांगल्या पगाराची नोकरी देणार आणि उत्तम आरोग्य सुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले आहे. काळे यांचे हे आश्वासन बेलापूरमध्ये चर्चेचा विषय बनले आहे. तसेच त्यांनी संदीप नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

शाळेची फी कमी करणार, प्रत्येक मुलाला चांगल्या पगाराची नोकरी, मनसेच्या गजानन काळे यांचा बॉण्ड पेपरवर शब्द
गजानन काळे
Follow us on

राज्यभरात सध्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे. मनसे नेते गजानन काळे यांना पक्षाकडून बेलापूर मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. गजानन काळे उमेदवारी मिळाल्यानंतर चांगलेच कामाला लागले आहेत. त्यांच्याकडून जोरदार प्रचार केला जातोय. विशेष म्हणजे गजानन काळे यांनी दोन 500 रुपयांच्या बॉण्ड पेपरवर नागरिकांना मोठमोठे आश्वासने दिली आहेत. मुलांच्या शाळेची फी कमी करणार, प्रत्येक मुलाला एमआयडीसीच चांगल्या पगाराची नोकरी देणार, असं आश्वासन गजानन काळे यांनी बॉण्ड पेपरमध्ये दिलं आहे. त्यामुळे गजानन काळे यांची बोलापूर आणि संपूर्ण नवी मुंबईत चांगलीच चर्चा देखील आहे. गजानन काळे यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया देखील दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली.

“लोकांना बदल हवा आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार संदीप नाईक 10 वर्ष ऐरोली विधानसभेचे आमदार होते. त्यांनी एकही प्रकल्प आणला नाही. त्याचबरोबर भाजपच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी सुद्धा बेलापूर मतदारसंघात शून्य काम केलं आहे. या दोघांच्या तुलनेत मनसे सातत्याने काम करत आहे. तसेच संदीप नाईकांनी यांनी वेळेत पक्षप्रवास केलेला आहे. तो सर्वसामान्य जनतेला मान्य नाही. त्याचबरोबर हे दोन नापास उमेदवार आहेत”, अशी टीका गजानन काळे यांनी केली आहे.

गजानन काळे यांचा बॉण्ड पेपरवर शब्द काय?

“नवी मुंबईचे नेते फक्त खोटे जाहीरनामा प्रसिद्ध करतात. तसेच निवडून आल्यानंतर प्रकल्पग्रस्तांसाठी काही करत नाहीत. मी 500 रुपयांच्या दोन बॉण्ड पेपरवरती लेखी स्वरुपात शब्द दिला आहे. शाळेची फी कमी करणार, आरोग्याच्या सोयी सुविधा चांगल्या उपलब्ध करून देणार, तसेच नवी मुबंईतील प्रत्येक मुलाला एमआयडीसीत रोजगार उपलब्ध करून देणार”, असं बॉण्ड पेपरवरती मी लिहून दिलं आहे

हे सुद्धा वाचा

‘संदीप नाईकांवर गुन्हा दाखल करावा’, गजानन काळेंची मागणी

“नुसतं कचराच्या डब्बे वाटप करत बसले आहेत. हा इतकाच कार्यक्रम संदीप नाईकांकडे राहिला आहे. संपूर्ण बेलापूर परिसरात गरम पाण्याच्या कॅटल्या वाटल्या आहेत. निवडणूक आयोगाने संदीप नाईकावंर गुन्हा दाखल करावा”, अशी मागणी गजानन काळे यांनी केली आहे. तसेच “जनतेने मनसेला मतदान करावं. माझा विश्वास आहे आम्ही नक्की जिंकून येऊ”, असंदेखील गजानन काळे यावेळी म्हणाले.