गजानन काळे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर अतिशय खालच्या दर्जाची टीका, सुषमा यांचा पुन्हा ‘मांजर’ असा उल्लेख

| Updated on: Jan 23, 2023 | 12:36 AM

मनसे नेते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी पुन्हा एकदा शिवसेनेच्या ठाकरे गटावर (Shiv Sena Thackeray Group) निशाणा साधलाय. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर खालच्या दर्जाची टीका केली.

गजानन काळे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर अतिशय खालच्या दर्जाची टीका, सुषमा यांचा पुन्हा मांजर असा उल्लेख
गजानन काळे
Follow us on

मुंबई : मनसे नेते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी पुन्हा एकदा शिवसेनेच्या ठाकरे गटावर (Shiv Sena Thackeray Group) निशाणा साधलाय. विशेष म्हणजे त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर टीका करताना त्यांचा मांजर असा उल्लेख केलाय. याशिवाय त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर खालच्या दर्जाची टीका केली आहे. “मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना (Raj Thackeray) पठ्ठ्या म्हणतात मग ‘मातोश्री’वरचा काय चोxx?”, अशा खालच्या शब्दांत गजानन काळे यांनी टीका केली. यावेळी त्यांनी सुषमा अंधारे यांच्यावरही सडकून टीका केली. “आता एक मांजर आली आहे. आपले राजकीय करीअर किती? कधी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत पत्रकार परिषद घ्यायच्या. आता कुठे डाळ नाही शिजली तर शिल्लक सेनेत गेल्या”, अशी टीका गजानन (Gajanan Kale) काळे यांनी केली. मनसेच्या सायन येथील घे भरारी अभियानात गजानन काळे बोलत होते.

“एमआयएममधून काल लोकं शिवसेनेत (उद्धव ठाकरे गट) आली. नेमका काय प्रॉब्लेम झालाय? औवेसीने भगवी शाल घातली की संजय राऊत काश्मीरला वेगळा टिळा लावून आले?”, असा सवाल त्यांनी केला.

“मातोश्रीचे आदुबाळ काही दिवसांपूर्वी तेजस्वी यादव यांना भेटून आले. ज्या हिंदुत्व आणि मराठीच्या विषयावर पक्ष स्थापन झाला होता त्या पक्षाने आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची लाचारी पत्करून विरुद्ध दिशेने वाटचाल सुरु झाली”, अशी टीका त्यांनी केली.

हे सुद्धा वाचा

गजानन काळे यांनी ठाकरे गटाची उडवली खिल्ली

“संजय राऊत काल अरविंद केजरीवाल यांचे भाऊ वाटत होते. आता उद्धव ठाकरे गट जम्मूची निवडणूक लढवणार म्हणे, इकडे राज्यात रसातळाला गेले. चिन्ह शिल्लक नाही आणि काश्मिरला लढतात. उद्या पाकिस्तानची निवडणूक लढवू नये म्हणजे झाले”, अशा शब्दांत गजानन काळे यांनी खिल्ली उडवली.

“संजय राऊत यांच्या कोठडीत बाजूला गर्दूल्ला झोपायचा की काय? त्यांची इतकी भाषा बिघडली. पक्ष बुडाला तरी विधान सुरुच आहे. सकाळ झाली की सुरुच असतात राऊत”, अशी टीका त्यांनी केली.

“राज्याच्या सरकारमध्ये सोबत असलेल्या कॉंग्रेसच्या रवी राजांनी आरोप केलाय की 1400 कोटींचा घोटाळा केलाय. कुठला घोटाळा सोडलाय? उंदीर घोटाळा, कोव्हिड घोटाळा”, असा दावा गजानन काळे यांनी केला.

“आदित्य ठाकरे तुम्ही युवा नेतृत्व आहात. आम्ही सहा महिने तुमच्याकडून एकच कॅसेट ऐकतोय गद्दार, खोके, झोके. आमचे हिंदुत्व म्हणजे मुखात राम आणि हाताला काम म्हणे. कुणाच्या हाताला काम मिळाले का?”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

“ओवेसी निजामाचा औलाद औरंगजेबाच्या थडग्यावर जावून उदात्तीकरण करतो. तुमचे सरकार असताना तुम्ही गुन्हा दाखल केला का? आम्ही भोंग्याचा विषय घेतला की 28,500 गुन्हे दाखल झाले. औरंगाबादेत आमच्यावर गुन्हे दाखल झाले”, असं काळे म्हणाले.

‘आदित्य ठाकरे ओवीसीला मिठी मारतील’

“तेजस्वी यादव यांना भेटणारे आदित्य ठाकरे येत्या काळात हैदराबादला जावून ओवीसीला मिठी मारतील. ती एक स्टुलवाली बाई म्हणते की शिवसेना परडीतील नागोबा आहे. हे शिवसेनेला कसं चालतंय? संपूर्ण वारकरी समाज रस्त्यावर आला आहे. तरी तुम्ही का काढलं नाही अंधारेला? हेच का तुमचे हिंदुत्व?”, असे सवाल त्यांनी केले.

“आमच्या एक दिवसांच्या नर्स बाईने एसआरएमध्ये एक गाळा ठेवलाय. संजय राऊत पुरेसे नव्हते म्हणून सुषमा ताईंना पक्ष संपवायला पाठवले आहे”, अशी टीका त्यांनी केली.

“माझ्या नेतृत्वावर 100 गुन्हे दाखल आहे. आता तुम्ही डोळ्यावरची पट्टी काढा. नाहीतर पुन्हा येतील माझं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. आणि म्हणतील मी मर्द आहे. कोरोना काळात समांतर सरकार अडीच वर्ष राज ठाकरेंनी कृष्णकुंजवरुन चालवलं”, असं गजानन काळे म्हणाले.