मुंबई : महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं त्यावेळेस मिनिमम काँमन प्रोग्राम ठरला होता.पण, हे सरकार मिनिमम काँमन हिंदुत्वावर गेल्याची टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. मंदिर खुली करण्यावरून सुरू असलेल्या वादात आता मनसेने देखील उडी घेतली आहे. (MNS Leader Sandeep Deshpande criticize Thackeray govt )
राज ठाकरेंनी दीड महिन्यापूर्वी मंदिर उघडण्याची मागणी केली होती. राज्यात मॉल उघडले जातात मग मंदिरं का बंद ठेवली जातात, असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला. कोरोना सारख्या संकटाच्या काळात देवाचा आधार असतो. यामुळे मंदिर उघडली गेली पाहिजेत, असंही संदीप देशपांडेंनी सांगितले.
‘मा.मुं’च्या कालच्या भाषणाचा अर्थ कळवा,1001रुपये मिळवा..
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) October 12, 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी फेसबूकवरून राज्यातील जनतेशी संवाद साधला होता. संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर देखील टीका केली होती. उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा अर्थ सांगा आणि 1001 रुपये मिळवा, असं ट्विट संदीप देशपांडेंनी केलं होतं.
लोकल सुरू करण्यावरूनही सरकारवर टीका
लोकल सेवा सुरू करण्यावरुनही संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला धारेवर धरले होते. ‘तुम्ही रेस्टॉरंट-बार सुरु करत आहात. एक-एक आस्थापना सुरु करताय, पण त्यासाठी लोकांनी कामावर कसं जायचं? त्या प्रश्नाचं उत्तर सरकार देत नाही’, अशी टीका संदीप देशपांडे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना यापूर्वी केली होती.
आंदोलन करुन जर सरकारला अक्कल येत नसेल आणि सरकारला डोकं नसेल तर आपण तरी काय करणार? हे सरकार फक्त फेसबुकवर घोषणा करणारं आहे, प्रत्यक्षात काहीच केलं जात नाही’ असं देशपांडे म्हणाले होते.
संबंधित बातम्या :
राज साहेबांचं सरकार आल्यावर व्याजासकट हिशोब चुकता करु, संदीप देशपांडे यांचा इशारा
(MNS Leader Sandeep Deshpande criticize Thackeray govt )