मुंबई : शिवसेनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताबा मिळवल्यानंतर उद्धव ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि इतर नेते शिवसेनेच्या आमदारांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. या पार्श्वभूमीवर उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. ही मुलाखत राज्याच्या राजकारणात चर्चेत आली आहे. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना सत्ताधारी भाजपा शिवसेना पक्षावर टीकास्त्र सोडलं. या मुलाखतीची चर्चा होत असताना आता मनसे नेते संदीप देशपांडे मुलाखत प्रदर्शित केली आहे.
मुलाखतीतून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विडंबन करत खिल्ली उडवली आहे. संजय राऊत यांनी ज्या पद्धतीने मुलाखत घेतली तशीत मुलाखत संदीप देशपांडे यांची घेतली गेली. कुणाचा आवाज असं टीझर सुरुवातीला देण्यात आलं आहे. ‘एक ज्वलंत आणि स्फोटक मुलाखत’ हे वाक्य विचित्र आवाजात रेकॉर्ड केलं असून त्यावर ‘कुणाचा आवाज’ असा टेक्स्ट लिहिला आहे.
मुलाखतकार : आज मी आणि फक्त मीच…त्यांची नेहमीच घेतो मुलाखत..ते महाराष्ट्राचे नव्हे, जगाचे एक नंबरचे माजी मुख्यमंत्री..त्यांची ओळख करून देण्याची गरजच नाही. कोरोनाच्या काळामध्ये घरात बसून सरकार चालवलं. फेसबुकच्या माध्यमातून ते तुमच्या घराचे कुटुंब सदस्य झाले. कोरोनासोबत आमची जायची तयारी आहे. कोरोनाची आमच्यासोबत राहण्याची तयारी आहे का? हे जे वाक्य ज्यांनी अजरामर केलं तेच..महानगरपालिकेचे करोडो रुपये खर्च केले..हजारो कोटी खर्च केले, खड्डे बुजवले नाहीत. रस्ते चांगले बनवले नाहीत. त्याच साहेबांची आज स्फोटक आणि ज्वलंत मुलाखत सुरु करुयात. काय सांगाल?
आवाज कुणाचा एक मुलाखत pic.twitter.com/GU5YZ8BqqN
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 26, 2023
संदीप देशपांडे : संजय…माफ करा..संतोष..मला घरी बसायला आवडतं. किंबहुना खुपच आवडतं. वडिलांना दिलेला शब्द..शिवसेनेचा मुख्यमंत्री..मर्दाची अवलाद..मर्द..दिल्लीश्वर..अफझल खानाच्या फौजा..कोरोना..मास्क..सुरक्षित अंतर..कोमट पाणी..कपटी..मशाल..आणि मी संकटात असलो की मराठी माणुस..थोडं थोडं हिंदुत्व..औरंगजेब.मिंधे गट..गद्दार..खंजीर..खोके..मुलाखत संपली..किंबहुना संपलीच..
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या विडंबनात्मक मुलाखतीनंतर ठाकरे गटाचे आमदार आक्रमक झाले आहेत. भास्कर जाधव यांनी जोरदार टीका करत खडे बोल सुनावले आहेत.