BIG BREAKING | मनसे नेत्याचा अतिशय टोकदार शब्दांमध्ये भाजपवर निशाणा, देवेंद्र फडणवीस यांचाही उल्लेख

| Updated on: May 13, 2023 | 11:57 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्य यशवंत किल्लेदार यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन भाजपवर सडकून टीका केली आहे. यशवंत किल्लेदार यांनी काँग्रेसचं अभिनंदन केलंय. तर भाजपवर सडकून टीका केली आहे.

BIG BREAKING | मनसे नेत्याचा अतिशय टोकदार शब्दांमध्ये भाजपवर निशाणा, देवेंद्र फडणवीस यांचाही उल्लेख
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्य यशवंत किल्लेदार यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन भाजपवर सडकून टीका केली आहे. यशवंत किल्लेदार यांनी काँग्रेसचं अभिनंदन केलंय. तर भाजपवर सडकून टीका केली आहे. विशेष म्हणजे कर्नाटकाच्या निवडणुकीच्या निकालांवरुन त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. यशवंत किल्लेदार यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत महाराष्ट्राची जनता ह्या निगरगट्ट राजकारण्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असं रोखठोक मत मांडलं आहे. यशवंत किल्लेदार यांनी ट्विटरवर आपली भूमिका मांडली आहे.

“महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करणाऱ्या प्रत्येक राजकीय घडामोडींमध्ये हात असलेल्या देवेंद्र फडणवीस तसेच उद्धव ठाकरे यांची कूटनीती महाराष्ट्र पाहत आहे. लवकरच जनतेची काठी चालेल आणि कर्नाटक प्रमाणेच महाराष्ट्राची जनता ह्या निगरगट्ट राजकारण्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”, असा घणाघात यशवंत किल्लेदार यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे.

‘जनेतेने भाजपला चांगलाच धडा शिकवला’

“आज कर्नाटकमध्ये काँग्रेसने यश मिळवत बहुमताचा आकडा गाठला आहे. प्रथम त्यासाठी काँग्रेसचं मन:पूर्वक अभिनंदन! कर्नाटकात 2018 साली झालेल्या निवडणुकांच्या जनतेने कोणालाच स्पष्ट बहुमत दिले नव्हते. मात्र काँग्रेस आणि जेडीएसने युती करुन बसवलेलं सरकार भाजपने 2019 मध्ये ऑपरेशन ‘ब्लू लोटस’ राबवत पाडलं आणि स्वत:चं सरकार बसवलं. पण तिथल्या जनतेचा हा घोडेबाजार लक्षात राहिला आणि जनेतेने भाजपला चांगलाच धडा शिकवला”, असा घणाघात यशवंत किल्लेदार यांनी केला.

‘महाराष्ट्रातही जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही’

“कर्नाटक निवडणुकांचे हाती आलेलेल कल पाहता, भाजपच्या विरुद्ध जनतेच्या मनात रोष दिसून येत आहे. भाजपने खेळलेल्या अशा फोडा-फोडीच्या खेळीमुळे त्यांच्या मतदार संकेतही प्रमाणात घट दिसून येत आहे. महाराष्ट्रातही 2019 ला झालेल्या निवडणुकीत जनतेने शिवसेना-भाजप युतीला कौल दिला होता. मात्र त्यांच्या अंतर्गत वादामुळे आधी राष्ट्रवादी-भाजप त्यानंतर महाविकास आघाडी आणि आता पुन्हा भाजपच्या घोडेबाजारामुळे भाजप-शिवसेना (शिंदे गट) हे सरकार उदयास आलं”,  असं किल्लेदार म्हणाले.

“प्रस्थापित राजकारण्यांचा जनतेच्या मनाविरोधात चाललेला हा राजकारणाचा खेळ जनता पाहत आहे. येणाऱ्या काळात आगामी निवडणुकांमध्ये कर्नाटकत प्रमाणेच महाराष्ट्रातील ही जनता राजकारणाचा आणि जनतेच्या मनाचा खेळ करणाऱ्या राजकारण्यांना आणि प्रस्थापित राजकीय पक्षांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”, असा दावा यशवंत किल्लेदार यांनी केला.