अशी कोणती मागणी होती की, राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंना सोडलं. राज ठाकरेंनी शिवसेना सोडून चूक केली, अशी टीका भुजबळांनी TV9च्या मुलाखतीतून केली आणि जुन्या जखमांवरची खपली काढण्याचा प्रयत्न केला. भुजबळ थेट मनसे अध्यक्षांवरच बोलल्यानं प्रकाश महाजन आणि संदीप देशपांडे भुजबळांवर तुटून पडले. आता भुजबळ बाळासाहेब आणि राज ठाकरेंवर का बोलले. त्याचं कारण म्हणजे
लोकसभेच्या महायुतीच्या प्रचारात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसह भुजबळांवर केलेली टीका.
आता राजकीय टीका टिप्पणीतून 24 वर्षांनंतर पुन्हा शिवसेना प्रमुखांच्या अटकेचा वाद वर आलाय. दुसरीकडे TV9च्या मुलाखतीतून भुजबळांनी, नाशिकच्या जागेवरुनही गौस्यस्फोट केला. दिल्लीत अमित शाहांनी तिकीट निश्चित केल्यानंतर फडणवीस आणि बावनकुळेंनीही मला लढण्यास सांगितलं. मात्र तरीही तिकीट जाहीर झालं नाही असं सांगतानाच, भुजबळांनी मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांवर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली. त्यावरुन दादांचे मंत्री मुश्रिफांनी नाशिकची जागा शिंदे गटाची असल्यानं त्यांनी सोडली नसल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांकडेच बोट दाखवलं.
आधी नाशिक लोकसभा आणि त्यानंतर राज्यसभेच्या जागेवरही सुनेत्रा पवारांनाच अजित पवारांनी संधी दिली. तिथंही पत्ता कट झाल्यानं भुजबळ जाहीरपणे ह्युमिलेट अर्थात अपमान झाल्याचं सांगत आहेत.