तुम्ही आयुष्यभर काय केलं? काँग्रेस, शिवसेना कुणी फोडली? राज ठाकरेंचा शरद पवार यांना सवाल

| Updated on: Oct 13, 2024 | 1:09 PM

mns raj thackeray: आज लिहून देतो. लाडकी बहिण योजनेचे या महिन्याचे पैसे येतील. पुढच्या महिन्याचे येतील. नंतर पैसे येणार नाही. जानेवारी फेब्रुवारीत राज्याकडे पगार द्यायला पैसे नसतील. कोण मागतं तुम्हाला फुकट. महिलांच्या हातांना काम द्या.

तुम्ही आयुष्यभर काय केलं? काँग्रेस, शिवसेना कुणी फोडली? राज ठाकरेंचा शरद पवार यांना सवाल
राज ठाकरे, शरद पवार
Follow us on

मनसेच्या मेळाव्यातून रविवारी राज ठाकरे यांनी सर्वच राजकीय पक्षांना घेरले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांना चार गोष्टी सुनावल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. मग शरद पवार यांना इतिहासाची आठवण करुन दिली. राज ठाकरे म्हणाले, शरद पवार म्हणतात पक्ष फोडला. मग तुम्ही आयुष्यभर काय केलं? १९७८ ला काँग्रेस फोडली. १९९१ला शिवसेना फोडली, त्यानंतर राणेंचं झालं. त्यांना फोडलं. तुम्ही कसल्या फोडाफोडीच्या गोष्टी बोलता. मी अजित पवारांबद्दल बोलत होतो. आता ते गुलाबी जॅकेट घालून फिरतात. कोणी सांगितलं माहीत नाही. भाजप त्यांना स्वीकारतो तरी कसा? अजित पवार भाजपमध्ये येण्या आधी मोदी म्हणतात ७० हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्यांना जेलमध्ये टाकू. त्याऐवजी मंत्रिमंडळात टाकलं. हे का होतंय. कारण तुम्हाला गृहित धरलंय. सर्वांना गृहित धरलंय, असे राज्यातील जनतेने राज ठाकरे यांनी सांगितले.

लोकांना फुकटात काहीच नको…

आज लिहून देतो. लाडकी बहिण योजनेचे या महिन्याचे पैसे येतील. पुढच्या महिन्याचे येतील. नंतर पैसे येणार नाही. जानेवारी फेब्रुवारीत राज्याकडे पगार द्यायला पैसे नसतील. कोण मागतं तुम्हाला फुकट. महिलांच्या हातांना काम द्या. कामातून त्या पैसे उभे करतील. त्यांना सक्षम बनवा. एवढ्या सक्षम महिला आहेतच. त्यांना मार्ग दाखवा. फुकट कसले पैसे देताय. बेरोजगारांना फुकट पैसे. शेतकऱ्यांना फुकट वीज. शेतकरी कुठे मागतो फुकट वीज. तो म्हणतो वीजेत सातत्य द्या. कमी पैश्यात द्या. पण वीज तर द्या. राज्यात कोणी काही मागत नाही. यांना फुकट देण्याच्या सवयी लावायच्या आहेत. एकदा सवयी लागल्या तर इतर राजकीय पक्ष तेच करतील. नागडा होणार महाराष्ट्र. राज्य म्हणून काही विचार करणार की नाही.

समुद्रात शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्याऐवजी गड किल्यांवर खर्च करा

समुद्रात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचा होता. विनायक मेटे यांनी मागणी केली होती. स्टॅच्यु ऑफ लिबर्टी पेक्षा दोन इंच उंच पुतळा हवा. कोण त्यांच्या डोक्यात घालतं माहीत नाही. मी तो पुतळा पाहिला. फ्रान्ससरकारने अमेरिकेला दिला होता. तो दगडी आयलँडवर आहे. आता एवढा उंच पुतळा झाला. मला शिल्पकला माहीत आहे. घोडा केवढा झाला? तुम्ही म्हणाल पटेलांचा पुतळा झाला. एका बाजूला चायनाला विरोध करायचा. चीनचे प्रोडक्ट घेऊ नका म्हणून सांगायचं आणि चीनमधून पटेलांचा पुतळा आणायचा.

हे सुद्धा वाचा

समजा उद्या पुतळा बनवला. पहिल्यांदा समुद्रात जी भर घालावी लागेल ती किती घालावी लागेल. सिंधुदुर्गातील पुतळा वाऱ्याने पडला. तो काही फार मोठा नव्हता. म्हणजे शिल्पकला ही गोष्ट समजून घ्या. नुसता पुतळा उभा करायचा नसतो. उद्या समुद्रातील भराव खचला. पुतळा हलला. भराव टाकून पुतळा उभा करायचा असेल तर किमान १५ ते २० हजार कोटी खर्च करावे लागेल. समुद्रात पुतळा उभा करण्यापेक्षा हे १५ ते २० हजार कोटी गडकिल्ल्यांवर खर्च केले तर राजा कोण होता, त्याने काय बांधलं हे सांगता येईल.