मुंबई: भाजप नेते मोहित कंबोज यांनी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाबाबत मोठा खुलासा केला आहे. सुनील पाटील हेच आर्यन खान प्रकरणाचे मास्टर माइंड असल्याचा गौप्यस्फोट करतानाच सुनील पाटील यांचे राष्ट्रवादीशी कनेक्शन असल्याचा दावा मोहीत कंबोज यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर हे सुनील पाटील नेमके कोण आहेत? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.
सुनील पाटील हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असून ते धुळ्याचे आहेत. गेल्या 20 वर्षापासून त्यांचा राष्ट्रवादीशी संबंध राहिला आहे. केवळ संबंधच राहिले नाही तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांचे जिगरी दोस्त आहेत. आर आर पाटील यांचे निकटवर्तीय होते. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांशी सुनील पाटील यांचे घरगुती संबंध आहेत. सुनील पाटील हे धुळ्याचे असले तरी ते मुंबईतच राहतात. गुजरात आणि दिल्लीतही त्यांचं वास्तव्य असतं. अनेक उच्चपदस्थ अधिकारी आणि राजकारण्यांशी त्यांचे संबंध आहेत. सुनील पाटील यांचा मंत्रालयात सहज वावर असल्याचं सांगितलं जात आहे. एखादं प्रकरण कसं हाताळायचं यात त्यांचा हातखंडा असल्याचं सांगितलं जातं.
धुळ्यातील टेकडी परिसरात त्यांचे कुटुंबीय राहते. याच ठिकाणी पाटील यांचे आईवडील राहतात. पाटील यांचं धुळ्यात अधूनमधून येणं जाणं असतं. त्यांच्या पूर्वजांना पाटीलकी मिळाली. तेव्हापासून या कुटुंबाने पाटील आडनाव धारण केल्याचं सांगितलं जातं.
काही वर्षापूर्वी पाटील हे धुळ्यातील गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष झाले होते. त्यावेळी त्यांनी गणेशोत्सवावर लाखो रुपये खर्च केले होते असं सांगितलं जातं.
मोहीत कंबोज यांनी सुनील पाटील यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. सुनील पाटीलने 1 तारखेला सॅम डिसोजाला व्हॉट्सअॅप केलं होतं. चॅट नंतर व्हॉट्सअॅप कॉल केला होता. माझ्याकडे 27 लोकांची लीड असून मुंबईत क्रुझ पार्टी होणार आहे. त्यात ड्रग्जचं सेवन होणार आहे. माझी एनसीबीच्या एखाद्या अधिकाऱ्याशी चर्चा करून द्या, असं पाटीलने सॅमला सांगितलं होतं. त्यानंतर सॅमने एनसीबीच्या व्ही.व्ही. सिंग या अधिकाऱ्याशी बोलणं करून दिलं, असा दावा कंबोज यांनी केला. तसेच सुनील पाटील बदल्यांचं रॅकेट चालवत होते. दिल्लीत बसून ते हे रॅकेट चालवत असतात. तेच पैसा घेऊन संबंधित मंत्र्यांना द्यायचे. त्यांचं राज्यभरात बदल्यांचं रॅकेट होतं. सरकार बदलल्यानंतर ते भूमिगत झाले. सरकार आल्यानंतर पुन्हा सक्रिय झाले. मोठमोठ्या हॉटेलमध्ये त्यांच्या पार्ट्या चालतात. पाटील यांचे गृहमंत्र्यांशी कनेक्शन कसे? असा सवाल त्यांनी केला आहे.
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 6 November 2021 https://t.co/ifK7ITHCI4 #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 6, 2021
संबंधित बातम्या:
नवाब मलिकांकडे 3 हजार कोटींची बेनामी संपत्ती, भंगारवाला करोडपती कसा झाला?; मोहित भारतीय यांचा सवाल
समीर वानखेडेंनी आर्यन खानचं अपहरण केलं, नवाब मलिक यांच्या गंभीर आरोपाने खळबळ
(mohit kamboj’s serious allegations, know who is sunil patil?)