monsoon return: नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा म्हणजेच मान्सून यंदा चांगलाच बरसला. महाराष्ट्रासह देशभरातील अनेक भागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. यामुळे यंदा खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामांना फायदा होणार आहे. राज्यातील धरणांमध्ये चांगला जलसाठा निर्माण झाल्यामुळे केवळ पिण्याचा पाण्याचा प्रश्न संपला नाही तर यंदा शेतीलाही मुबलक पाणी मिळणार आहे. आता मान्सून आपला परतीचा प्रवास सुरु करणार आहे. त्यासंदर्भातील माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. मान्सून १९ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत परतीचा प्रवास सुरु करण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने सांगितले आहे.
मान्सून यंदा सरासरीपेक्षा जास्त असणार असल्याचा अंदाज मे महिन्यातच हवामान विभागाने व्यक्त केला होता. त्यानंतर अंदमान निकोबार बेटांवर वेळेपूर्वी मान्सून दाखल झाला आहे. केरळमध्ये वेळेआधी मान्सून दाखल झाला. सर्वसाधारणपणे मान्सून १ जूनला केरळमध्ये पोहोचतो आणि ८ जुलैपर्यंत संपूर्ण देशात पसरतो. त्यानंतर त्याचा परतीचा प्रवास १७ सप्टेंबरच्या आसपास सुरू होतो आणि १५ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण देशातून माघारी फिरतो.
हवामान विभागाने सांगितले की, वायव्य भारताच्या काही भागांमधून नैऋत्य मोसमी वारे परत फिरण्यासाठी पुढील आठवड्यात अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे. यामुळे १९ ते २५ सप्टेंबर दरम्यान मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होणार आहे. सध्या सक्रिय असलेल्या ला-निनाच्या प्रभावामुळे सप्टेंबरमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान अभ्यासकांकडून व्यक्त केली गेली. हा पाऊस ऑक्टोंबरमध्येही लांबणार असल्याचे भाकीत व्यक्त केले होते. परंतु हवामान विभागाने ही शक्यता फेटाळली आहे.
13 sept, A low pressure area formed over SE Bangladesh and nbhd in the night of 12th Sept & lay over same region at 0530hrs of today.
It is likely to move slowly WNW wards & intensify to depression over coastal West Bengal & adjoining NW Bay of Bengal during next 48 hours.
IMD pic.twitter.com/FdM2kbvOLH— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 13, 2024
देशात सरासरी पर्जन्यमान ७७२.५ मिमी असते. परंतु १ जूनला मान्सून देशात दाखल झाल्यापासून आतापर्यंत ८३६.७ मिमी पाऊस पडला आहे. हे प्रमाण आठ टक्के जास्त आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली. पूर्व आणि ईशान्य भारतात सरासरीपेक्षा १६ टक्के कमी पाऊस पडला. यंदा राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.