मुंबई : 4 जूनला राज्यामध्ये मान्सूम (Monsoon) दाखल होणार होता. मात्र, तीन ते चार दोन दिवसांपासून अनेक शहरांमध्ये पावसाने हजेरी लावलीये. ढगाळ वातारण आणि अधूनमधुन पावसाच्या सरी कोसळत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात उष्णतेपासून आराम मिळालाय. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र (Maharashtra) आणि विदर्भामध्ये गेल्या तीन दिवसांपासून पाऊस थोड्याफार प्रमाणात येतो आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार या आठवड्यामध्ये राज्यामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यात मान्सून सक्रिय होणार आहे. यामुळे पुढील काही दिवस चांगला पाऊस (Rain) होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्रामध्ये यंदा पाणीटंचाईचे प्रमाण अत्यंत कमी झाले. हातावर मोजण्या इतक्याच गावांमध्ये पाणीटंचाई बघायला मिळाली.
मुंबईमध्ये आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण बघायला मिळते आहे. कमाल तापमान 25 डिग्री सेल्सियस आहे. या आठवड्याचे अंतिम तापमान 31 आणि संपूर्ण तापमान 26 डिग्री सेल्सियस असू शकते.
नागपुर मध्ये कमाल तापमान 39 डिग्री सेल्सियस असण्याची शक्यता असणार आहे. किमान तापमान 27 डिग्री सेल्सियस असेल. यामुळे पाऊस येण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.
औरंगाबाद
आज पुण्यातील वातावरण देखील मुंबईच्या वातावरणासारखेच बघायला मिळते आहे. या आठवड्याच्या शेवटी कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस असेल.
औरंगाबादमध्ये कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस असणार आहे. किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाजा व्यक्त केला जात आहे. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहणार असून पावसाची शक्यता आहे.
नाशिकमध्ये कमाल तापमान 30 डिग्री सेल्सियस असणार आहे. तर किमान तापमान हे 24 डिग्री सेल्सियस असेल. आठवड्यामध्ये ढगाळ वातारणासह पावसाची देखील शक्यता वर्तवली जात आहे.