Urfi Javed : महाराष्ट्राच्या राजकारणाचे ‘उर्फी’करण, सर्वच घसरले, दोष…; संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल

| Updated on: Jan 15, 2023 | 8:11 AM

उर्फीच्या ढालीमागे अंजलीसारख्या अनेक निर्भयांचा आकांत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचेच उर्फीकरण झाले आहे. सर्वच घसरले आहे, दोष कुणाला द्यावा?

Urfi Javed : महाराष्ट्राच्या राजकारणाचे उर्फीकरण, सर्वच घसरले, दोष...; संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल
urfi javed
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: उर्फी जावेद हिच्या तोकड्या कपड्यांवरून सध्या महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हा मुद्दा लावून धरला आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीला घेरल्यानंतर शिवसेनेपासून ते काँग्रेस, राष्ट्रवादीपर्यंतच्या नेत्यांनी या वादात उडी घेऊन चित्रा वाघ यांच्यावरच टीका केली आहे. तर शिंदे गटाने उर्फीला खडेबोल सुनावले आहे. आता या वादात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. दैनिक सामनातील आपल्या रोखठोक सदरातून त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

पूजा चव्हाणला अजून न्याय मिळालेला नाही. पण आता भाजपचे आंदोलन उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यात अडकले आहे. अंजलीचा आक्रोश कंझावालच्या रस्त्यावर घुमतो आहे. पण मुंबईत उर्फीच्या तोकड्या कपड्यांनी गदारोळ केला आहे.

हे सुद्धा वाचा

उर्फीच्या ढालीमागे अंजलीसारख्या अनेक निर्भयांचा आकांत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचेच उर्फीकरण झाले आहे. सर्वच घसरले आहे, दोष कुणाला द्यावा? असा सवालच संजय राऊत यांनी रोखठोक या सदरातून केला आहे.

मॉरल पोलिसिंग भाजपवरच उलटले

उर्फी प्रकरणात जे मॉरल पोलिसिंग झाले ते भाजपवरच उलटले आहे. उर्फी कोण? ती काय करते? या भानगडीशी सामान्ज जनतेला काही पडलं नव्हते. उर्फीने तोकडे कपडे घातल्याने बलात्कार वाढतील हा दावा हस्यास्पद आहे. महिलांवरील अत्याचार ही एक विकृती आहे. ही विकृती कायद्यावरही मात करते, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

जगात नाचक्की झाली

इकडे भाजप उर्फी प्रकरणात लढा देत असतानाच तिकडे देशाच्या राजधानीत धक्कादायक घटना घडली. दिल्लीत असभ्यता आणि क्रूरतेचे टोक गाठणारे कृत्य भाजपच्याच एका पदाधिकाऱ्याने केले. अंजली नावाच्या तरुणीच्या स्कुटीला धडक मारली. त्यानंतर ती खाली कोसळली. तिचा पाय त्या गाडीच्या चाकात अडकला.

भरधाव कारने अंजलीस घासत फरफटत अनेक किलोमीटर नेले. त्या गाडीच्या चाकात अडकून ती तफडत होती. आक्रोश करत होती. तो कारचालक भाजपचा पदाधिकारी होता. दिल्लीतील या घटनेने आपली जगात नाचक्की झाली, अशी टीकाही करण्यात आली आहे.

एका उर्फी जावेदचं काय घेऊन बसलात?

निर्भयाप्रकरणाच्यावेळी भाजप दिल्लीसह देशभरात रस्त्यावर उतरला होता. तोच भाजप आज सत्तेवर असल्याने अंजली प्रकरणात थंड पडला. मुंबईत उर्फीच्या तोकड्या कपड्यांवरून संस्कृती रक्षणाचे धडे देणाऱ्यांनी अंजलीचा आक्रोश जणू ऐकलाच नाही. अशा अनेक अंजलींनी गेल्या सात वर्षात तडफडून प्राण सोडले. एका उर्फी जावेदचे काय घेऊन बसलात?; असंही राऊत यांनी भाजपला सुनावलं आहे.