मुंबई | 24 जुलै 2023 : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे मोठा गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे. या व्हिडीओचा प्रोमो ठाकरे गटाकडून शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये वर्षातला सर्वात मोठा स्फोटक आणि थेट भाग लवकरच असं म्हटलं आहे. तसेच या व्हिडीओ उद्धव ठाकरे आपली रोखठोक भूमिका मांडताना दिसत आहेत.
आवाज महाराष्ट्राच्या कुटुबप्रमुखाचा असा उल्लेख या प्रोमोत करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांची ही मुलाखत 26 आणि 27 जुलैला सकाळी 8 वाजता प्रक्षेपित केली जाणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आवाज कुणाच्या या पॉडकास्टसाठी उद्धव ठाकरेंची ही मुलाखत घेण्यात आलीय.
संजय राऊत : वर्षभरापूर्वी अशाच मुसळधार पावसामध्ये तुमच्या नेतृत्वाखालील सरकार वाहून गेलं होतं.
उद्धव ठाकरे : वाहून नव्हतं गेलं, खेकड्यांनी धरण फोडलं होतं.
संजय राऊत : ते असं म्हणत आहेत, देवेंद्र फडणवीस की, उद्धव ठाकरे यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला
उद्धव ठाकरे : मग राष्ट्रवादीने काय खुपसलं होतं की जेणेकरुन तुम्ही राष्ट्रवादी तोडली? उठसूट दिल्लीला मुजरा मार ही आपली संस्कृती नाहीय.
संजय राऊत : लोकशाही वाचणवणार का?
उद्धव ठाकरे : लोकशाही साधा माणूस वाचवणार.
“बाबरीच्या वेळेला जबाबदारी घ्यायला नव्हता. राम मंदिराचा निर्णय तुम्ही घेतला नाही. मग राम मंदिराचं श्रेय कसं घेऊ शकता?”, असा सवाल उद्धव ठाकरे या मुलाखतीत भाजपला करताना दिसत आहेत. “देशावर जो प्रेम करतो. देशासाठी जो मरायला तयार आहे तो हिंदू आहे. माझा देश माझा परिवार आहे हे माझं हिंदुत्व”, असंही ते म्हणाले आहेत.
वर्षातील सर्वात मोठी आणि प्रखर मुलाखत!
“आवाज महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखांचा!”
आवाज कुणाचा | पॉडकास्ट शिवसेनेचा | भाग ४ | प्रोमो – Shivsena Podcast Part 4 – Promo
सहभाग:
माननीय श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुखनिवेदकः
श्री. संजय राऊत,
खासदार व कार्यकारी संपादक – सामनाभाग… pic.twitter.com/5critjy6V6
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) July 24, 2023
“माझ्याविरोधात आज आख्ख भाजप आहे. तरीदेखील तुम्हाला उद्धव ठाकरेची भीती का वाटते? उद्धव ठाकरे एकटा व्यक्ती नाहीय. उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेबांचे विचार आहेत”, असं उद्धव ठाकरे म्हाणाले. “मला संपवण्यात तुम्हाला आनंद मिळत असेल तर संपवा. बघू ना मग, माझ्या वडिलांचा आशीर्वाद, माझ्या जनतेची सगळी साथ सोबत आणि तुमची ताकद”, असं उद्धव ठाकरे मला म्हणाले.