मुंबई : जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून जोर धरलेल्या पावसाचा मुंबईत अक्षरश: कहर सुरु आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई यांसह ठिकठिकाणी गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबईतील मुलुंड परिसरात भिंत कोसळली आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. (Mulund West Wayde Chawl compound Wall collapsed)
मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड पश्चिम (Mulund West) परिसरातील कलपादेवी पाडा परिसरातील वायदे चाळीत ही घटना घडली आहे. काल रात्री 8 च्या सुमारास वायदे चाळीतील संरक्षक भिंत कोसळली. यात एका व्यक्तीचा दुर्देवी मृत्यू झाला. दिलीप वर्मा (35) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
Maharashtra: A man succumbed to injuries after a wall collapsed on him in Mumbai’s Mulund (West)
— ANI (@ANI) June 17, 2021
मुंबईसह ठाणे पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज
दरम्यान मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात आज (18) आणि उद्या (19) मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहेत. यावेळी सोसायट्याचा वाराही सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्तक राहावं, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मुंबई, मुंबई उपनगर आणि वसई-विरार परिसरातही सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. विवार पूर्वमधील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी आता पुढील 3 ते 4 तास मुंबई, ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायगड जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. यातील काही भागात सकाळपासून तब्बल 160 ते 180 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. आता पुढील 3 ते 4 तास मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
Possibilities of ver intense spells in Mumbai and Thane Vasai Virar, Dahanu, parts of Raigad in next 3,4 hrs as seen from Radar images..
Already at few places its in range of 160 180 mm since morning.
Please take care… pic.twitter.com/tpVuVZuHXj— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 17, 2021
(Mulund West Wayde Chawl compound Wall collapsed)
संबंधित बातम्या :
मुंबई, ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायगडमध्ये पुढील 3 ते 4 तास मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज
VIDEO | मुंबई एक्सप्रेस फ्री वेवर माशांनी भरलेला टेम्पो उलटला, मासे गोळा करण्यासाठी नागरिकांची गर्दी
नियम न पाळणे, गर्दी वाढल्यास तिसऱ्या लाटेला लवकर आमंत्रण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे