Mumbai Landowners: मुंबईतील सर्वाधिक जमीन कोणाच्या ताब्यात, 20% वाटा या जमीन मालकांकडे

| Updated on: Oct 21, 2024 | 2:24 PM

Mumbai Landowners: मुंबईतील रिअल इस्टेट मार्केट एक लाख एकर पेक्षा जास्त जमीन आहे. त्यातील 34,000 एकर जमीन राहण्यायोग्य आहे. या 34,000 मधील जवळपास 20% जमीन नऊ संस्था, परिवाराकडे आहे.

Mumbai Landowners: मुंबईतील सर्वाधिक जमीन कोणाच्या ताब्यात, 20% वाटा या जमीन मालकांकडे
Mumbai
Follow us on

Mumbai Landowners: मुंबईतील जमिनीस सोन्याचा भाव आहे. यामुळे मुंबईत साधा फ्लॅट घेणेही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अनेक उद्योजक अन् बॉलीवूडमधील स्टार राहतात. मुंबईतील जमिनीच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत. परंतु मुंबईतील जमिनीचा 20% वाटा या जमीन मालकांकडे आहे. या जमीन मालकांकडे वारसहक्कानुसार आहेत. कोणाकडे आहे सर्वाधिक जमीन…

स्लम पुनर्वास प्राधिकरण (SRA) द्वारा केलेल्या पाहणीनुसार, मुंबईतील जमिनीचा 20% टक्के भाग काही खास जमीन मालकांकडे आहे. एका सर्व्हेनुसार, मुंबईतील रिअल इस्टेट मार्केट एक लाख एकर पेक्षा जास्त जमीन आहे. त्यातील 34,000 एकर जमीन राहण्यायोग्य आहे. या 34,000 मधील जवळपास 20% जमीन नऊ संस्था, परिवाराकडे आहे. या 20% पैकी अर्ध्यापेक्षा जास्त जमीन विक्रोलीमध्ये गोदरेज परिवाराकडे आहे.

3,400 एकर जमीन गोदरेजकडे

मुंबईतील विक्रोलीमधील 3,400 एकर जमीन गोदरेजकडे आहे. ही जमीन एक्सप्रेस हाइवे (EEH) जवळ आहे. गोदरेज उद्योग समूह साबणापासून रिअर इस्टेटपर्यंत आहे. या ग्रुपचा विभागनी नुकतीच दोन ग्रुपमध्ये झाली. आदी गोदरेज आणि त्यांचे भाऊ नादीर गोदरेज यांच्याकडे गोदरेज इंडस्ट्रीज आहे. तसेच कजिन जमशेद आणि स्मिता यांना अनलिस्टेड गोदरेज एंड बॉयस आणि त्यांची सहायक कंपन्या मिळाल्या आहेत. गोदरेज परिवाराकडे असलेल्या जमिनीची किंमत ₹30,000 कोटी रुपये आहे. परंतु त्याचे बाजारमूल्य ₹50,000 कोटी रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

दुसऱ्या क्रमांकावर एफ.ई. दिनशॉ ट्रस्ट

एफ.ई. दिनशॉ ट्रस्ट हा जमिनीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 683 एकर जमीन त्यांच्याकडे आहे. या ट्रस्टची मालाड आणि आसपासच्या परिसरात जमीन आहे. एफ.ई. दिनशॉ 1936 मध्ये मरण पावले. ते पारशी वकील आणि जमीनदार होते.

मुंबईतील तिसरे सर्वात मोठे जमीन मालक प्रतापसिंह वल्लभदास सुर्जी यांचे कुटुंब आहे, ज्यांच्याकडे मुंबईच्या भांडुप परिसरात आणि आसपास 647 एकर जमीन आहे.

मुंबईतील चौथ्या क्रमांकाची जमीन मालक जीजीभॉय अर्देशीर ट्रस्ट आहे, ज्याची मुंबईतील चेंबूर परिसरात 508 एकर जमीन आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ए.एच. वाडिया ट्रस्टकडे मुंबईतील जमिनीचा मोठा भाग आहे. 20 व्या शतकाच्या सुरुवातीला ही जमीन कामा कुटुंबाकडे होती. 19व्या शतकाच्या सुरुवातीस अर्देशीर होरमुजी वाडिया यांनी कुर्ल्याचा भाडेपट्टा वार्षिक ₹3,587 रुपयामध्ये घेतला होता. ज्यावर आता बहुतेक अतिक्रमण झाले आहे.

बायरामजी जीजीभॉय ट्रस्ट

बायरामजी जीजीभॉय ट्रस्टची मुंबईतील विविध भागात 269 एकर जमीन आहे. सर बायरामजी जीजीभॉय यांना 1830 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीकडून 12,000 एकर जमीन मिळाली होती. ते 19व्या शतकातील एक महान पारशी समाजसेवी होते. त्याच्याकडे बांद्रा लँड्स एंड आहे, जिथे आता ताज हॉटेल आहे.