मुंबई: आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानाने मुंबईत आलेले 3 हजार 310 प्रवासी करोनाबाधित असल्याचे आढळले आहेत. गेल्या दहा महिन्यांत मुंबई विमानतळावर केलेल्या चाचण्यांमध्ये हे प्रवासी बाधित आढळल्याची माहिती पालिकेने दिली.आंतरराष्ट्रीयच्या तुलनेत देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे बाधितांमधील प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे.
डिसेंबर 2020 ते सप्टेंबर 2021 पर्यंत मुंबईत आलेले एकूण तीन हजार 310 प्रवासी करोनाबाधित असल्याचे आढळले आहे. यात देशांतर्गत प्रवासातून मुंबईत आलेल्या दोन हजार 198 प्रवासी आणि एक हजार 112 आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा समावेश आहे. 2 लाख 41 हजार 23 देशांतर्गत विमान प्रवाशांच्या, तर एक लाख 80 हजारपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या करोना चाचण्या मुंबई विमानतळावर करण्यात आल्या होत्या.
देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट होताना दिसत होती, मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. गुरुवारी आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत अल्पशी वाढ झाली आहे. बुधवारी दिवसभरात देशात 31 हजार 382 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 318 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. देशातील सक्रिया कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या गेल्या सहा महिन्यांतील निचांकावर पोहोचली आहे.
कोरोना संसर्गाच्या फैलावामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सध्या तरी 75 ते 80 टक्के कोविड रुग्णांना रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता राहिलेली नाही. ते घरीच टेलिकन्स्ल्टेशनने बरे होत आहेत. मात्र, असं असलं तरी कोरोनाचा रुग्णावर दीर्घकालीन परिणाम होतो. अनेक महिन्यांपासून रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याचंही दिसून आलं आहे. त्यामुळे कोरोनातून मुक्त झाल्यावरही दर सहा महिन्याला टेस्ट करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
यूरोपियन हार्ट जर्नलमध्ये काही संशोधन प्रकाशित झालं आहे. त्यानुसार ज्यांना कोरोनाची लागण झालेली नाही. त्यांच्या तुलनेत कोरोनाची लागण झालेल्यांना कार्डिअॅक अॅरेस्टचा धोका अधिक असल्याचं दिसून आलं आहे. त्यातही महिलांना मृत्यूचा धोका अधिक आहे. व्हायरस थेट मायोकार्डियमच्या आत एसीई2 रिसेप्टर कोशिका नष्ट करतात. कोविडमुळे हृदयांच्या मांसपेशींना सूज येऊ शकते. त्याला मायोकार्डिटिस म्हणतात. वेळेवर त्याकडे लक्ष दिलं नाही तर त्यामुळे हृदयविकार होऊ शकतो.
संबंधित बातम्या:
आता डेंग्यूचाही वेगळा व्हेरिएंट, औरंगबाादेत रुग्णसंख्येत अचानक वाढ, ताप अंगावर काढू नका
कोरोनामुक्त झाल्यावरही दर सहा महिन्याला टेस्ट का करावी?; वाचा सविस्तर