धक्कादायक, मुंबईत घरी मागवलेल्या आईसक्रीममध्ये निघाले कापलेले बोट, कंपनी म्हणते…

| Updated on: Jun 14, 2024 | 11:03 AM

Ice Creams case in mumbai: आईस्क्रीम खाल्ल्यानंतर घशाच्या खाली एक घासही उतरला नाही. काहीच खाण्याची माझी इच्छा नव्हती. माझ्या जीभेवर एखादा माणसाच्या अवयव कसा जाऊ शकतो असे वाटत होते. एका महिन्यापूर्वीची ती आईस्क्रीम होती.

धक्कादायक, मुंबईत घरी मागवलेल्या आईसक्रीममध्ये निघाले कापलेले बोट, कंपनी म्हणते...
Ice Creams
Follow us on

Mumbai Ice Cream Case: खाद्यपदार्थांमध्ये कॉक्रोज, माशी, इतर घाण निघाल्याचे प्रकार अनेकवेळा घडतात. काही महिन्यांपूर्वी पुणे शहरातील कॅन्टीनमध्ये समोसे खाताना त्यात कंडोम सापडले होते. परंतु त्यापेक्षाही धक्कादायक प्रकार मुंबईतून समोर आला आहे. मुंबईतील मलाडमध्ये आईसक्रीममधून मानवाचे कापलेले बोट निघाल्याचा दावा एका डॉक्टराने केला आहे. त्यासंदर्भात पोलिसांकडे तक्रारही दिली आहे. आता डीएनएमधून ते बोट कोणाचे? याचा शोध पोलीस घेणार आहे. तसेच कंपनीकडून त्यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

काय आहे प्रकार

मुंबईतील मलाडमध्ये राहणाऱ्या डॉक्टर ब्रेंडन सेराओ (27) यांनी पोलिसांना सांगितले की, एका ऑनलाईन डिलेव्हरी प्लॅटफॉर्मवरुन त्याने तीन आईसक्रीम मागवले. त्यात दोन मँगो आणि एक बटरस्कॉट आईसक्रीम होते. त्यांनी बटरस्कॉच आईसक्रीम खाण्यासाठी कोन उघडला. त्यावेळी खाताना वेगळेच काही त्यांना लागले. तोंडात एक मोठा पीस आला. मी तो पीस तोंडातून काढला. तेव्हा मला काही विचित्र वाटले. चिकन सारखा काही तरी प्रकार होते. मी निरखून पाहिले तर नख दिसले आणि ते बोट असल्याचे दिसले. त्यानंतर मी घाबरलो आणि सरळ पोलीस ठाणे गाठले. कारण हा प्रकार म्हणजे एखाद्याचे बोट तुटले असेल किंवा खून असू शकतो.

तक्रारदार म्हणतो, मला जेवणच गेले नाही

काल आईस्क्रीम खाल्ल्यानंतर घशाच्या खाली एक घासही उतरला नाही. काहीच खाण्याची माझी इच्छा नव्हती. माझ्या जीभेवर एखादा माणसाच्या अवयव कसा जाऊ शकतो असे वाटत होते. एका महिन्यापूर्वीची ती आईस्क्रीम होती. या आईस्क्रीमची बॅच किती लोकांकडे गेली असेल. त्याचे रक्त कितीतरी आईस्क्रीममध्ये गेले असेल. त्या व्यक्तीला काय काय आजार असतील माहीत नाही. आता मला ही माझे ब्लड चेक करावे लागेल. आता आईस्क्रीमचा विषय काढला तरी मला किळस येते.

हे सुद्धा वाचा

पोलीस काय म्हणतात

या प्रकारावर पोलीस म्हणतात, आमच्याकडे एक तक्रारदार आला. त्याला आईस्क्रीम खाताना एक ते दीड सेंटीमीटरचे बोट सापडले. आम्ही गुन्हा दाखल केला आहे. एमओ कंपनीचे आईस्क्रीम आहे. या कंपनीशी संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. माणसाचा बोट कोणाचे हे तपासानंतर सांगता येईल. दरम्यान, आता पोलीस त्या बोटाची डीएनए चाचणी आणि फोरेन्सिक तपास करणार आहे.

कंपनी काय म्हणते…

एमओ आईसक्रीम कंपनीने उत्तर दिले आहे, त्यांनी म्हटले आहे की, “आम्ही या थर्ड पार्टी उत्पादन करत होतो. ते आता थांबवले आहे. तसेच आमच्या गोदामांमध्ये असलेले सर्व उत्पादन नष्ट करत आहोत. बाजारात असलेला माल परत घेत आहोत.”