मुंबई, दि.24 डिसेंबर | मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आणि कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिम याच्यावर विषप्रयोग झाल्याची बातमी सोशल मीडियावर आली. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या बातमीला पाकिस्तान आणि भारताकडूनही दुजोरा दिला नाही. परंतु अंडरवर्ल्ड डॉन दाऊन इब्राहिम याला जोरदार धक्का भारताने दिला आहे. भारताच्या या निर्णयामुळे डी कंपनी अडचणीत आली आहे. केंद्र सरकारने दाऊद याच्या संपत्तीचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी वृत्तपत्रात जाहिरात दिली गेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दाऊदच्या संपत्तीचा लिलाव येत्या पाच जानेवारी रोजी होणार आहे. हा लिलाव दुपारी दोन ते 2.30 दरम्यान होणार आहे.
दाऊद इब्राहिम हा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रहिवाशी होता. मुंबके हे त्याचे गाव आहे. या ठिकाणी असलेल्या त्याच्या संपत्तीचा लिलाव करण्यात येणार आहे. रत्नागिरी मुंबके येथे दाऊदचा बंगला आणि आंब्याची बाग आहे. एकूण चार जागांचा लिलाव करण्यात येणार आहे. त्यात शेत जमिनी आहे. जवळपास 20 गुठ्यांहून अधिक जमिनीचा लिलाव करण्यात येणार आहे. चार जमिनीपैकी एका जमिनीची किंमत 9 लाख 41 हजार 280 रुपये तर दुसऱ्या शेतजमिनीची किंमत ही 8 लाख 8 हजार 770 रुपये आहे.
दाऊद याच्या 11 मालमत्तेचा लिलाव 2000 मध्ये आयकर विभागाकडून करण्यात आला होता. परंतु त्यावेळी लिलाव प्रक्रियेत कोणीच आले नव्हते. परंतु मागील काही वर्षांपासून तपास संस्था त्याच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात यशस्वी ठरल्या आहेत. 2018 मध्ये मुंबईतील नागपाडा येथेली दाऊदचे हॉटेल आणि एक गेस्टसोबत एका बिल्डिंगची विक्री करण्यात आली होती. त्यानंतर दाऊदची बहिन हसीना पारकर हिचा दक्षिण मुंबईतील फ्लॅटचा लिलाव करण्यात आला होता. नागपाडामधील 600 वर्ग फूटचा फ्लॅट एप्रिल 2019 मध्ये 1.80 कोटींत विकला गेला होता. त्यानंतर पाकमोडिया स्ट्रीटवर असलेली मालमत्ता एका ट्रस्टने 3.51 कोटीत घेतली होती. 2020 मध्ये रत्नागिरीत दाऊद इब्राहिम याच्या परिवाराची असलेली 1.10 कोटीची संपत्ती विकली गेली होती. त्यात दोन प्लॅट एक पेट्रोल पंपचा समावेश आहे.