Mumbai Boat Accident: जेव्हा मुंबईतून एलिफंटाच्या दिशेने जाणाऱ्या ‘नीलकमल’ प्रवाशी बोटीला भारतीय नौदल (Indian Navy) च्या वेगवान स्पीड बोटीने जोरदार धडक दिली तेव्हा होत्याचं नव्हतं झालं. पण कठीण प्रसंगी एका जर्मन पर्यटकाने 5 वर्षांच्या मुलाचे प्राण वाचवले आहेत. सध्या चिमुकल्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात झाला तेव्हा प्रियांश व त्याचे आई-वडील आणि पुणे जिल्ह्यातील चाकण येथून फिरण्यासाठी आले होते. बोट एलिफंटाच्या दिशेने जात असताना अचानक एक स्पीड बेड आली आणि तिने प्रवाशी बोटीला धडक दिली. या दुर्दैवी अपघातात अनेकांनी प्राण गमावले आहेत. तर अनेक जण अद्यापही बेपत्ता आहे. सध्या समुद्रात शोध मोहिम सुरु आहे.
बोटीत उपस्थित असलेल्या पर्यटकाने पाच वर्षांच्या मुलाचे प्राण वाचवले. माध्यामांनी जर्मन नागरिकाने सांगितलं, त्याचा एक विदेशी मित्र अद्याप बेपत्ता आहे. रिपोर्टनुसार, बोटीत 3 परदेशी नागरिक होता. पण याबद्दल अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. बोटीतील प्रवाशांचे नातेवाईक रुग्णालयात चौकशीसाठी जमा झाले आहेत. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी रुग्णालयाला भेट देऊन तेथील व्यवस्थेबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याची माहिती देखील समोर येत आहे.
मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाकडे जाणारी बोट दुसऱ्या बोटीला धडकल्याने भीषण अपघात झाला. बोटीला धडकल्याने दुसरी बोट समुद्राच्या मध्यभागी उलटली. उरण, कारंजा येथे स्पीड बोटीला धडकून हा अपघात झाला. ‘नीलकमल’ नावाच्या बोटीत 120 पेक्षा जास्त प्रवासी होते. त्यामधील 13 जणांचा मृत्यू झाला असून रेस्क्यू टीमने आतापर्यंत 100 पेक्षा अधिक लोकांचे प्राण वाचवले आहेत. तर शोध मोहिम अद्यापही सुरु आहे.
नौदलाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, ही बोट इंजिन चाचणीसाठी जात होती, मात्र त्यानंतर दुपारी 4 वाजता तिचं नियंत्रण सुटलं आणि कारंजाजवळ नीलकमल नावाच्या बोटीला धडकली. ‘नौदलाने तत्काळ तटरक्षक दल आणि सागरी पोलिसांच्या समन्वयाने शोध आणि बचाव कार्य सुरू केलं. बचाव कार्यात नौदलाची चार हेलिकॉप्टर, 11 बोटी, तटरक्षक दलाची एक बोट आणि सागरी पोलिसांच्या तीन बोटींची मदत घेण्यात आली.’ असं देखील नौदलाने सांगितलं आहे.