लिफ्ट घेऊन वांद्रे-वरळी सी लिंकवर उतरले, बाबा मुलाशी व्हिडिओ कॉलवर बोलले आणि….मन सुन्न करणारी घटना

| Updated on: Jul 18, 2024 | 10:58 AM

"वडिल नेहमी प्रमाणे दक्षिण मुंबईतील कार्यालयात जाण्यासाठी निघाले. त्यांच्या वर्तनावरुन मनात असं काही असेल, असं अजिबात वाटलं नाही" त्यांनी वाहन चालकाला कार थांबवायला सांगितली. गाडीतून उतरले. वाहन चालकाच्या मनात सुद्धा आलं नाही. त्याने फक्त सूचना ऐकली.

लिफ्ट घेऊन वांद्रे-वरळी सी लिंकवर उतरले, बाबा मुलाशी व्हिडिओ कॉलवर बोलले आणि....मन सुन्न करणारी घटना
BWSL
Follow us on

वांद्रे-वरळी सी लिंकच्या टोल प्लाझावर त्यांनी दक्षिण मुंबईला जायचय सांगून एका वाहन चालकाकडे लिफ्ट मागितली. आपली कार बंद पडलीय, लवकर पोहोचायचय सांगून लिफ्ट घेतली. सी लिंकच्या मध्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी वाहन चालकाला कार थांबवायला सांगितली. गाडीतून उतरले. पुढे काहीतरी अघटित घडेल, असं वाहन चालकाच्या मनात सुद्धा आलं नाही. त्याने फक्त सूचना ऐकली. तो गाडी घेऊन पुढे निघून गेला. गाडीतून उतरलेल्या व्यक्तीने व्हॉट्स एपवरुन 22 वर्षाच्या मुलाला व्हिडिओ कॉल केला. आपण आयुष्य संपवत आहोत, याची त्यांनी मुलाला कल्पना दिली.

त्यानंतर त्या व्यक्तीचा मोबाइल स्विच ऑफ झाला. वांद्रे-वरळी सी लिंकवरुन उडी मारुन त्यांनी आपलं जीवन संपवलं. मनाला चटका लावणारी ही घटना बुधवारी दुपारी 3.15 वाजता घडली. भावेश सेठ असं मृत व्यक्तीच नाव आहे. ते 56 वर्षांचे होते. तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर फायर ब्रिगेडने त्यांचा मृतदेह शोधून काढला. बिझनेसमध्ये नुकसान झाल्याने भावेश विवंचनेत होते. त्यातून त्यांनी हे टोकाच पाऊल उचलल्याची शक्यता आहे.

कुटुंबासाठी मोठा धक्का

भावेश सेठ यांच्या मुलाने संध्याकाळी 4.30 वाजता वांद्रे पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी सी लिंक आणि टोल प्लाझाच सीसीटीव्ही फुटेज तपासलं. त्यात सेठ गाडीमध्ये बसल्याच आणि सी लिंकवर उतरल्याच दिसलं. भावेश सेठ रहायला घाटकोपरला होते. त्यांच्या मुलाने सांगितलं की, “वडिल नेहमी प्रमाणे दक्षिण मुंबईतील कार्यालयात जाण्यासाठी निघाले. त्यांच्या वर्तनावरुन ते तणावाखाली आहेत, असं अजिबात वाटलं नाही” या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबाला धक्का बसला आहे.