मुंबईकरांसाठी तीन दिवस रेल्वे प्रवास जिकारीचा ठरणार आहे. मध्य रेल्वेने शुक्रवार मध्यरात्री साडे बारापासून महा मेगाब्लॉकला सुरुवात केली आहे. तब्बल ६३ तासांचा हा मेगाब्लॉक आहे. रविवारी दुपारी ३.३० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. यामुळे या दिवसांत गजर नसेल तर रेल्वे प्रवास टाळण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील १० आणि ११ क्रमांकाच्या फलाटाची लांबी वाढवण्यात येत आहे. तसेच ठाणे स्थानकावरील ५ आणि ६ फलाट क्रमांकांची रुंदी वाढवण्यासाठी हा विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉक दरम्यान तब्बल ९३० लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच ७२ एक्स्प्रेस रद्द केल्या आहेत. शेकडोंच्या संख्येने लोकल शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत.
रेल्वेचा मेगा ब्लॉक सुरु होताच पहाटेपासून रेल्वे स्थानकावर दिसणारी गर्दी दिसत नाही. कल्याण डोंबिवली रेल्वे स्टेशनवर शुकशुकाट आहे. रेल्वे प्रशासनाकडून ठाणे ते सीएसटी दरम्यान तीन दिवसांचा जम्बो मेगाब्लॉक आहे. शुक्रवारी मध्यरात्री बारा वाजल्यापासून सुरू असलेला मेगाब्लॉक रविवारी दुपारपर्यंत सुरू राहणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात फलाट क्रमांक 10 आणि 11 तर ठाणे रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक पाच आणि सहाचे रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने जम्बो मेघाब्लॉक घेतला आहे.
मध्य रेल्वे लोकलच्या एकूण 930 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी 161, शनिवारी 534, रविवारी 235 लोकल फिऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सगळ्यात मोठा म्हणजे 63 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक असून आवश्यकता असल्यास रेल्वेचा प्रवास करा, असे आवाहन रेल्वे प्रशासन कडून करण्यात आलेले आहे.
रेल्वे प्रशासनाच्या आव्हान नंतर अनेक कंपन्यानी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फॉम होम’ करण्याच्या सूचना आपल्या कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. दुसरीकडे ज्या कंपन्यांनी सुट्टी दिल्या नाही किंवा अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणारे पोलीस पालिका कर्मचाऱ्यांसह शासकीय कर्मचारी स्टेशन परिसरातून रेल्वेचा प्रवास करताना दिसत आहे. मात्र नेहमी गजवलेला गर्दीचे स्टेशन म्हणून ओळखले जाणारे रेल्वे स्टेशनवर आज शुकशुकाट पसरला आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरील फलाटांच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. यामुळे पुण्याहून मुंबईकडे जाण्यासाठी 40 जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. रेल्वे गाड्या रद्द असल्याने एसटीवर प्रवाशांचा ताण पडणार आहे. यामुळे एसटी महामंडळाच्या पुणे विभागाकडून जादा गाड्याचं नियोजन केले आहे. मुंबईसाठी पुणे स्टेशन येथून 40 जादा बसेस सोडण्यात येणार आहे.