मुंबई : ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या रुपाचे संकट अजूनही सरलेले नसताना कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. राज्याची राजधानी मुंबईमध्ये रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात दिवसभरात कोरोनाचे 922 नवे रुग्ण आढळले आहेत. कालच्या म्हणजेच 25 डिसेंबरच्या तुलनेत ही रुग्णसंख्या 165 ने वाढली आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्या वाढत असून ही धोक्याची घंटा असल्याचे म्हटले जात आहे. आज दिवसभरात 326 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
मुंबईत सध्या कोरोनाची काय स्थिती ?
मागील काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. 14 डिसेंबर रोजी 225 कोरोना रुग्ण आढळले होते. 26 डिसेंबर रोजी हाच आकडा 922 वर पोहोचला आहे. आज दिवसभरात 922 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली. तसेच दिवसभरात 326 रुग्ण कोरोनामुक्त झाले. मुंबईत आतापर्यंत 7 लाख 47 हजार 864 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण कोरोनामुक्त होण्याचा दर 97% आहे. सध्या मुंबईत 4295 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मुंबई महापालिका क्षेत्रात रुग्णवाढीचा दर 0.06% तर रुग्णदुपटीचा दर 1139 दिवसांवर आहे. एकट्या मुंबई पालिका क्षेत्रात 14 डिसेंबर रोजी 225 कोरोना रुग्ण आढळले होते. ही संख्या वाढत जाऊन 19 डिसेंबरपर्यंत 336 वर पोहोचली होती. तर 23 डिसेंबर रोजी मुंबईत सक्रिय कोरोनाग्रस्तांचा आकडा 600 पर्यंत पोहोचला होता. आज म्हणजेच 26 डिसेंबर रोजी कोरोनाग्रस्तांची संख्या एक हजारपर्यंत पोहोचली आहे.
#CoronavirusUpdates
25th December, 6:00pm
Positive Pts. (24 hrs) – 922
Discharged Pts. (24 hrs) – 326Total Recovered Pts. – 7,47,864
Overall Recovery Rate – 97%
Total Active Pts. – 4295
Doubling Rate – 1139 Days
Growth Rate (19 Dec – 25 Dec)- 0.06%#NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) December 26, 2021
14 डिसेंबर- 225 रुग्ण
15 डिसेंबर- 238 रुग्ण
16 डिसेंबर- 279 रुग्ण
17 डिसेंबर- 295 रुग्ण
18 डिसेंबर- 283 रुग्ण
19 डिसेंबर- 336 रुग्ण
20 डिसेंबर- 204 रुग्ण
21 डिसेंबर- 327 रुग्ण
22. डिसेंबर- 490 रुग्ण
23. डिसेंबर- 602 रुग्ण
24. डिसेंबर- 683 रुग्ण
25. डिसेंबर- 757 रुग्ण
26. डिसेंबर-922 रुग्ण
दरम्यान, वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबई तसेच पूर्ण महाराष्ट्रात राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधक नियम लागू केले आहेत. संपूर्ण राज्यभर सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 यावेळेत बंदी आहे. लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसावी आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसावी किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल तेवढी उपस्थिती असावी असे सांगण्यात आले आहे. इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसावी आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल तेवढ्याच लोकांची उपस्थिती असावी याची घबरदारी घेण्याचे राज्य सरकारने निर्देश दिलेले आहेत. बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशा ठिकाणी लोकांची उपस्थिती क्षमतेच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त नसावी असे नव्या नियमांत सांगण्यात आले आहे.
नाताळ बाबा मुंबईकरांसाठी आनंदासोबत ० कोविड मृत्यूचे वरदान घेऊन आला!
पण एकीकडे हा आनंद असताना वाढते कोविड रुग्ण ही एक चिंताजनक बाब आहे. मुंबईकरांनो, कोविडसंबंधी सर्व सूचनांचे पालन करा आणि सुरक्षित रहा.#ConstantVigilance #NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) December 25, 2021
इतर बातम्या :
कोंबड्याना मांजर करून कोकणाचे प्रश्न सुटणार आहेत का?; अजित पवारांनी नितेश राणेंना फटकारले
प्रकाश आंबेडकर हे ‘रिपब्लिकन’ नाहीत, जोगेंद्र कवाडे यांचं रिपाइं ऐक्यावरही मोठं विधान