Corona : कोरोनाचं संकट वाढतंय, दादरच्या लॅबमध्ये 12 जणांना कोरोना, मुंबईत नव्या 683 रुग्णांची नोंद

| Updated on: Dec 25, 2021 | 8:03 AM

मुंबई 24 डिसेंबरला सायंकाळी 6 वाजेपर्यंत आलेल्या माहितीनुसार 683 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर, दादर (Dadar) येथील लाल पॅथ लॅबमधील 12 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

Corona : कोरोनाचं संकट वाढतंय, दादरच्या लॅबमध्ये 12 जणांना कोरोना, मुंबईत नव्या 683 रुग्णांची नोंद
दादरमधील लॅब सील
Follow us on

मुंबई: कोरोना विषाणू (Corona) संसर्ग पुन्हा वाढू लागल्याचं दिसून येत आहे. मुंबई 24 डिसेंबरला सायंकाळी 6 वाजेपर्यंत आलेल्या माहितीनुसार 683 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर, दादर (Dadar) येथील लाल पॅथ लॅबमधील 12 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. या घटनेमुळं खळबळ उडाली असून महापालिकेच्यावतीनं पॅथॉलॉजी लॅब सील करण्यात आली आहे.

लॅबमध्ये काम करणाऱ्या नारायण विजय राणे यांना कोविडची लागण झाली होती. महापालिकेच्या तपासणीत या लॅबमध्ये काम करणाऱ्या 12 कर्मचाऱ्यांना कोविडची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यानंतर दादर पश्चिमेला असलेली लाला पॅथ लॅब महापालिकेने सील केली आहे.

कोरोना बाधिताच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरु

लॅबमध्ये काम करणाऱ्या नारायण विजय राणे यांना कोविडची लागण झाली होती. त्यानंतर महापालिकेने त्याच्या संपर्कात आलेल्या 39 जणांचा शोध सुरू केला आणि महापालिका लॅब पर्यंत पोहोचली. लॅब मधील कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता 19 पैकी 12 जण कोविड बाधित असल्याचे आढळून आले आहेत.

मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली

कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. शुक्रवारी मुंबईथ 683 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 267 कोरोना रुग्णांना बरं झाल्यावर डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत एकूण 7 लाख 47 हजार 258 कोरोना रुग्ण बर झाले आहेत. मुंबईत सध्या 3227 सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईत ओमिक्रॉनचे 11 नवे रुग्ण

मुंबई महापालिका क्षेत्रात ओमिक्रॉनच्या 11 नव्या रुग्णांची नोंद शुक्रवारी झाली आहे. मुंबईतील ओमिक्रॉन बाधितांचा आकडा 46 वर पोहोचला आहे. त्यापैकी 19 जणांना बरं झाल्यानं डिस्चार्ज देण्यात आला आहे.

इतर बातम्या:

औरंगाबादेतही जिनोम सिक्वेन्सिंग लॅब! विद्यापीठात की घाटी रुग्णालयात? तीन दिवसात निर्णय येणार!

Western Railway : पश्चिम रेल्वेकडून मेगा ब्लॉक जाहीर, रविवारी गोरेगाव ते बोरिवली दरम्यान सेवा बंद राहणार, प्रवाशांसाठी महत्त्वाचं आवाहन

Mumbai Corona Update 12 people of pathology lab Dadar BMC seal laboratory