लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान 20 तारखेला होणार आहे. पाचव्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार व निवडणूक रंगात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस आणि प्रशासन सतर्क झाले आहे. शहरात गस्ती वाढवल्या जात आहेत. पोलिसांच्या गस्ती दरम्यान ऐन निवडणुकीच्या तोंडावर कल्याणमध्ये दोन दिवसांत गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
केतन बोराडे आणि सोनू झा असे या आरोपीची नावे आहे. दोघांकडून गावठी कट्टा, दोन मॅक्झिन, 7 जिवंत काडतूसे कल्याण बाजारपेठ पोलिसांनी जप्त केले आहेत. मात्र अशा प्रकारे खुले आम आरोपी भर गर्दीत बंदूक घेऊन फिरत असल्याने कल्याणमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बंदूक घेऊन फिरणारे कोण ? त्यांना कुठला राजकीय सपोर्ट आहे का? कल्याणमध्ये चालंलय तरी काय ? असा सवाल आत्ता उपस्थित होत आहे.
कल्याणमध्ये दोन दिवसांपूर्वी बाजारपेठ पोलिसांनी कमरेला गावठी कट्टा लावून बाजारात फिरत असलेल्या केतन बोराडे नावाच्या आरोपीला बेड्या ठोकल्या. हा आरोपी एक सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर 21 गुन्हे दाखल दाखल आहेत. या गोष्टीला 24 तास पूर्ण होण्याच्या आधी आता कल्याण पश्चिममध्ये स्टेशन परिसरात एका तरुणास अटक केली. कल्याणमध्ये पोलिसांनी सापळा रचत सोनू झा नावाच्या तरुणाला अटक केली. सोनू झा हा मूळचा बिहारचा राहणारा आहे. तो एटीएम एक्सचेंजचा गुन्हा करत असून यात तो पकडला गेला आहे.
सोनू झा बंदूक दाखवून समोरच्या व्यक्तिला घाबरवून पळ काढत होता. त्यासाठी तो गावठी कट्टयाचा वापर करीत होता. सध्या या दोन्ही आरोपींकडून दोन गावठी कट्टा, दोन मॅक्झिन, 7 जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केले आहेत. परंतु खुले आम आरोपी भर गर्दीत बंदूक घेऊन फिरत असल्याने कल्याण नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बंदूक घेऊन फिरणारे कोण ? या लोकांना कुठला राजकीय सपोर्ट आहे का? कल्याणमध्ये चालंलय तरी काय ? असा सवाल आता उपस्थित होत आहे.