मुंबई : मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरणात (Mumbai Drugs case) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) आजची रात्र ऑर्थर रोड कारागृहातच काढावी लागणार आहे. तर दुसरीकडे या प्रकरणातील दोन आरोपींना आज मोठा दिलासा मिळालाय. आरोपी मनीष राजगीर (Manish Rajgeer) आणि अविन साहू (Avin Sahu) या दोघांना विशेष NDPS न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणात जामीन मिळालेले हे पहिले आरोपी आहेत. (Special NDPS court grants bail to Manish Rajgir and Avin Sahu in drugs case )
विशेष NDPS न्यायालयाने मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरणात मनीष राजगीर आणि अविन साहू यांना जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात जामीन मिळालेले ते पहिले आरोपी आहेत. मनीष राजगीर यांच्यावर 2.4 ग्रॅम गांजा बाळगल्याचा आरोप होता आणि अविन साहू यांच्यावर जहाजावर दोन वेळा प्रतिबंधित पदार्थ खाल्ल्याचा आरोप होता. क्रुझवरून या दोघांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, विनंती करुनही एनसीबीने आपल्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी घेतले गेले नसल्याचा दावा अविन साहू याने केला आहे.
Manish Rajgaria was accused of possessing 2.4gms of ganja, and Avin was accused of consuming contraband twice on the ship. They were arrested after the cruise ship returned.
Avin claimed that his blood samples were not taken to test for consumption, despite requests.
— Live Law (@LiveLawIndia) October 26, 2021
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावरील आजच्या सुनावणीला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे आर्यन खानला आजची रात्र आर्थर रोड कारागृहातच काढावी लागणार आहे. उद्या म्हणजेच 27 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा या जामीन अर्जावर युक्तिवाद होईल. आज दिवसभरात फक्त आर्यन खानचे वकील मुकूल रोहतगी यांनी बाजू मांडली. उद्या दुसऱ्या बाजूने युक्तिवाद होणार आहे.
मला आज दुपारी जामीन अर्जावरील एनसीबीच्या उत्तराची एक प्रत मिळाली आणि मी एक प्रत्युत्तर दाखल केलं आहे. हे प्रकरण 2 ऑक्टोबरपासून सुरू झाले आहे. आर्यन हा ग्राहक नव्हता. आर्यन खानला विशेष अतिथीच्या रुपात क्रुझवर आमंत्रित करण्यात आलं होतं. त्याला प्रतिक गाभा याने आमंत्रित केलं होतं. प्रतिक गाभा हा एक आयोजक आहे. त्याने आर्यन आणि आरोपी अरबाज मर्चंटला आमंत्रित केलं होतं. दोघांना एकाच व्यक्तीने आमंत्रित केलं होतं. ते दोघे एकत्र क्रुझवर गेले होते.
आर्यन खानला चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून कुठल्याही प्रकारचं ड्रग्स मिळून आलेलं नाही. त्यांच्याविरोधात आरोप हा आहे की आरोपी अरबाज मर्चंट सोबत क्रुझवर आला होता आणि त्याच्यावर ड्रग्स ठेवल्याचा आरोप आहे. आर्यन विरोधात कट रचला जातोय. आर्यन अरबाजसोबत आला. आर्यनला अरबाजकडे असलेल्या गोष्टींची माहिती असल्याचा दावा केला जातोय. कुणाच्यातरी बुटामध्ये काय आहे, त्याच्याशी आर्यनचा काही संबंध नाही, असा दावा रोहतगी यांनी केला.
इतर बातम्या :
तपास अधिकाऱ्याची जात, धर्म काढणं दुर्दैवी; NCB चा वापर राजकीय दबावासाठी का होईल? फडणवीसांचा सवाल
Special NDPS court grants bail to Manish Rajgir and Avin Sahu in drugs case