मुंबईतील डबेवाले पुन्हा आले चर्चेत, किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेकापूर्वी डबेवाल्यांनी काय पाठवले?

| Updated on: May 05, 2023 | 12:52 PM

mumbai news : मुंबईतील डबेवाले पुन्हा चर्चेत आले आहे. शनिवारी ६ मे रोजी किंग चार्ल्स तिसरे यांच्या राज्याभिषेक समारंभ होत आहे. त्यासाठी डबेवाल्यांनी विशेष भेटवस्तू पाठवली आहे. या समारंभासाठी पुण्यातील शिक्षकास निमंत्रण दिले गेले आहे.

मुंबईतील डबेवाले पुन्हा आले चर्चेत, किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेकापूर्वी डबेवाल्यांनी काय पाठवले?
Mumbai Dabbawale
Image Credit source: tv9 network
Follow us on

मुंबई : किंग चार्ल्स तिसरे यांच्या राज्याभिषेक समारंभ 6 मे 2023 रोजी होणार आहे. या समारंभासाठी जगभरातून 2,200 लोकांना आमंत्रित केले गेले आहे. सामाजिक कार्याच्या गटातून पुणे येथील शिक्षकास आमंत्रण दिले आहे. पुणे शहरानंतर आता मुंबई या समारंभानिमित्त चर्चेला आले आहे. किंग चार्ल्स तिसरा यांचा शनिवारी राज्याभिषेक होणार आहे. यानिमित्ताने त्यांनी मुंबईतील डबेवाल्यांनी (mumbai dabbawala) त्यांच्यांसाठी खास भेटवस्तू पाठवली आहे. मुंबईतील समारंभात ही भेटवस्तू ब्रिटीश उच्चायुक्कांना देण्यात आली.

काय पाठवले डब्बावाल्यांना

ब्रिटीश उच्चायुक्तालयाने मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ज्यामध्ये मुंबईतील डबेवाल्यांनी चार्ल्स यांच्यांसाठी भेटवस्तू दिली. पारंपरिक पुणेरी पगडी डबेवाल्यांना चार्ल्स यांच्यांसाठी दिली. पुणेरी पगडी 19व्या शतकापासून प्रचलित आहे. सन्मानाचे प्रतीक म्हणून पुणेरी पगडीची ओळख आहे. मुंबईच्या डबेवाल्यांनी ब्रिटिश उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्यांकडे ती दिली. ही पगडी आणि उपरणे राज्याभिषेकाच्या वेळी राजा चार्ल्स यांना देण्यात येणार आहेत.

हे सुद्धा वाचा

डबेवाले आणि राजघराणाचे नाते

मुंबई डब्बावाला संघटनेशी ब्रिटिश राजघराण्यांचे विशेष नाते आहे. 2003 मध्ये किंग चार्ल्स यांनी प्रिन्स म्हणून भारताला भेट दिली होती. तेव्हा त्यांनी डबेवाल्यांची भेटू घेतली होती. त्यांच्या कार्याची प्रशंसा केली होती. एप्रिल 2005 मध्ये लंडनमध्ये प्रिन्स चार्ल्स आणि कॅमिला पार्कर यांच्या लग्न समारंभासाठी मुंबईतील डबेवाला युनियनच्या दोन सदस्यांना आमंत्रित करण्यात आले होते.

130 जुना व्यवसाय

मुंबईतील डबेवाल्यांचा व्यवसाय 130 वर्षांहून अधिक जुना आहे. त्यांच्या वितरण प्रणालीचे देशातच नव्हे तर परदेशातही खूप कौतुक होत आहे. मुंबईत सायकलवर लटकलेले अनेक टिफिन बॉक्स सहज दिसतात. डबेवाले युनियनमध्ये 5,000 हून अधिक लोक आहेत. दररोज ते दोन लाखांहून अधिक डब्बे पोहोचवण्याचे काम करतात. महादू हावजी बाचे यांनी हे काम सुरु केले होते. डबेवाले काम करत गेले तसे त्यांच्या व्यवस्थापनाचे उच्चांक आपोआप घडत गेले. गिनिजबुकात डबेवाल्यांची नोंद झाली आहे.

कधी डबे आदलाबदल होत नाही

डबेबाले कर्मचाऱ्यांना जेवणाचे डबे पोहचवितात. त्यानंतर रिकामे डबे गोळा करून ते पुन्हा परत पाठवण्यात येतात. डबे घरांघरांतून गोळा करणे व रिकामे डबे परत नेणे ही सर्व कामे अतिशय काटेकोर, वक्तशीरपणे व कमी मोबदला घेऊन करण्यात येतात. डब्यांचे वितरण करतांना हे डबेवाले कोणतेही प्रत्यक्ष इंधन खर्च करीत नाहीत, की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत नाही. त्यानंतरही कधी डबे आदलाबदल होत नाही.

हे ही वाचा

किंग चार्ल्सच्या राज्याभिषेकासाठी पुणे शहरातील शिक्षकास आमंत्रण, सामाजिक कार्याची घेतली दखल