मागठाणे | 07 ऑगस्ट 2023 : आज दहीहंडीचा सण आहे. त्यामुळे ठिकठिकाणी उत्साहाचं वातावरण आहे. अशातत ठिकठिकाणी भव्य दहीहंडी उत्सवांचं आयोजन करण्यात आलं आहे. . गोविंदा पथक रचत असलेले थरावर थर नागरिकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू थर आहेत. अशातच कलाकारांनाही या दहीहंडी उत्सवाला आमंत्रित करण्यात येत आहे. बॉलिवूडमधील आणि मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते-अभिनेत्री आणि गायकांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आलं आहे. मागठाण्यातील तारामती चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीनेही दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला डान्सर गौतमी पाटील हिने हजेरी लावली आहे. सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम…, या गाण्यावर तिने परफॉर्मन्स सादर केला.
गौतमी पाटीलचा मोठा चाहता वर्ग आहे. तिचा डान्सही अनेकांना आवडतो. गौतमी पाटीलची एक झलक दिसावी म्हणून चाहते प्रयत्न करत असतात. अशात आज दहीहंडी उत्सवात गौतमी हजेरी लावणार म्हटल्यावर तिच्या चाहत्यांनी हजेरी लावली नसती तरच नवल! गौतमीचा डान्स पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम… या गाण्यावर गौतमीने परफॉर्मन्स सादर केला. तेव्हा प्रेक्षकांनीही तिच्यासोबत या गाण्यावर ठेवा धरला.
पाव्हणं जेवला का? या गाण्यावरही गौतमीने जबरदस्त डान्स केला. तिच्या या डान्सला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. उपस्थितांनी टाळ्या अन् शिट्ट्यांच्या माध्यमातून डान्सला पसंती दिली. यावेळी तरूणाईत उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला.
यावेळी गौतमीने माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा खूप छान वाटतंय. मी जास्त कार्यक्रम पुण्यात करते. आज मुंबईत कार्यक्रम करून छान वाटत आहे. कार्यक्रमानिमित्त मी बऱ्याच ठिकाणी जाते. सगळीकडे जसा प्रतिसाद असतो, तसाच इथेही चांगला प्रतिसाद मिळाला. लोकांचं प्रेम बघून छान वाटलं. मुंबईत सुरक्षित वाटलं. इतर ठिकाणीही मी सुरक्षित आहे. पण मुंबईकरांचं आजचं प्रेम बघून मी भारावून गेली आहे, असं गौतमी पाटील म्हणाली.
मागाठाण्यातील तारामती चॅरिटेबल फाउंडेशन आणि आमदार प्रकाश सुर्वे तर्फे आयोजित भव्य दहीहंडी उत्सावाला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात गौतमी पाटील हिच्यासोबतच करिश्मा कपूर, बिपाशा बसू यांची हजेरी पाहायला मिळत आहे. यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील इथे येणार आहेत. त्यामुळे यंदाच्या या दहीहंडी उत्सवाचा तरूणाईमध्ये जल्लोष पाहायला मिळतोय.