मुंबई : केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)यांनी प्रथमच दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्गाचे विलोभनीय फोटो शेयर केले आहेत. हा महामार्ग पाहून प्रत्यक्षात परदेशात असल्याचा भास होईल. परंतु हे फोटो परदेशातील नाही तर दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्गावरील बडोदा ते विरार दरम्यानचे आहे. हा महामार्ग पुर्ण झाल्यावर मुंबई-दिल्ली प्रवास फक्त 12 तासात प्रवास सुसाट होणार आहे.हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांतून महामार्ग जात आहे. दिल्ली- मुंबई ग्रीन एक्स्प्रेस वे 1380 किलोमीटरचा आहे.
दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाचे काम आता जवळपास पूर्ण होत आले आहे. यात बडोदा-अंकलेश्वर, दिल्ली-जयपूर, मध्य प्रदेशात पसरलेले अनेक विभाग आहेत. नितीन गडकरी यांनी हे फोटो ट्विटद्वारे शेयर केले. फोटो शेअर करताना गडकरी यांनी #PragatiKaHighway #GatiShakti हे हॅशटॅग वापरले आहे. त्यात देश प्रगतीने विकासाच्या महामार्गावर जात असल्याचे म्हटले आहे. गडकरींचे हे ट्विट हजारोवेळा रिट्विट करण्यात आले आहे. तसेच हजारो जाणांनी लाईक केले आहे.
Stunning views from Vadodara – Virar Section of Delhi-Mumbai Expressway. Limiting the distance for prosperous India. #PragatiKaHighway #GatiShakti
PC- @cbdhage pic.twitter.com/BPnU6eCZwt
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) January 21, 2023
कसा आहे महामार्ग
देशाची राजधानी दिल्ली ते आर्थिक राजधानी मुंबईला जोडणाऱ्या ग्रीन एक्स्प्रेस वेच्या कामाची पाहणी नितीन गडकरी यांचे स्पप्न होते. या महामार्गासाठी १ लाख कोटी रुपये खर्च येणार आहे. दिल्ली ते मुंबई हा 1380 कि.मीचा एक्स्प्रेस वे हा देशातील सर्वात लांबीचा एक्स्प्रेस वे असेल. या महामार्गामुळं दिल्ली ते मुंबई अंतर 130 किलोमीटरनं कमी होईल. तर, नवी दिल्ली ते मुंबई यामार्गात येणाऱ्या शहरांना जोडलं जाईल. दिल्ली, फरिदाबाद, सोहना, जयपूर शहरांना जोडलं जाईल. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवे हा एकूण 8 लेन चा असणार आहे.