मुंबई : दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाचा पहिला टप्पा आता सुरु होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 12 फेब्रवारी रोजी दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस (Delhi Mumbai Expressway)चे उद्घाटन करणार आहेत. तब्बल 1,386 किलोमीटर लांबीच्या या एक्स्प्रेस वे मुळे दिल्ली मुंबई अंतर 12 तासांत पुर्ण होणार आहे. या मार्गातील सोहना-दौसा या पहिल्या टप्प्याचे रविवारी लोकर्पण करण्यात येणार आहे. यामुळे दिल्ली ते जयपूर अंतर केवळ दोन तासांत पुर्ण करता येणार आहे. या माध्यमातून भाजपने राजस्थान विधानसभा निवडणुकीवर लक्ष ठेवले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे मोदींचा मास्टर स्ट्रोक ठरणार आहे.
Aesthetic night views from the architectural marvel #Delhi_Mumbai_Expressway. Have a look!!#BuildingTheNation #PragatiKaHighway #GatiShakti pic.twitter.com/akjlyDVwnw
हे सुद्धा वाचा— Nitin Gadkari (@nitin_gadkari) February 10, 2023
महाराष्ट्रातील नागपूर-मुंबई समृद्धी मार्गाचा पहिला टप्पा महिन्याभरापुर्वी सुरु झाला होता. नागपूर ते शिर्डीपर्यंतचा हा मार्ग आहे. याचा दुसरा टप्पा लोकसभा निवडणुकीपुर्वी सुरु करण्याचा प्रयत्न होणार आहे. शिर्डी ते मुंबईपर्यंतच्या या मार्गातील बहुतांश काम पुर्ण झाले आहे. यामुळे येत्या डिसेंबरपर्यंत समृद्धी महामार्ग सुरु होण्याची शक्यता आहे.
आता मुंबई-दिल्ली अन् राजस्थान कनेक्शन
मुंबई दिल्ली एक्स्प्रेस वे याचा संबंध राजस्थान विधानसभा निवडणुकीशी जोडला जात आहे. हा प्रकल्प अनेक वर्षांपासून सुरु आहे. परंतु याला राजस्थान विधानसभा निवडणुकीपुर्वी सुरु करण्यात येणार आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपला विकासाचा मुद्दा उपस्थित करता येणार आहे.
कसा आहे महामार्ग
देशाची राजधानी दिल्ली ते आर्थिक राजधानी मुंबईला जोडणाऱ्या ग्रीन एक्स्प्रेस वे हे नितीन गडकरी यांचे स्वप्न होते. या महामार्गासाठी 1 लाख कोटी रुपये खर्च येणार आहे. दिल्ली ते मुंबई हा 1380 कि.मीचा एक्स्प्रेस वे हा देशातील सर्वात लांबीचा एक्स्प्रेस वे असेल. या महामार्गामुळं दिल्ली ते मुंबई अंतर 130 किलोमीटरनं कमी होईल. तर, नवी दिल्ली ते मुंबई यामार्गात येणाऱ्या शहरांना जोडलं जाईल. दिल्ली, फरिदाबाद, सोहना, जयपूर शहरांना जोडलं जाईल.
1380 किमी असलेला हा द्रुतगती महामार्ग 8 लेनचा आहे आणि भविष्यातील गरज ओळखून तो 12 लेनपर्यंत वाढविता येईल. तो दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश आणि गुजरात या राज्यातून जाईल. त्यामुळे देशाची राजधानी आणि आर्थिक राजधानी दिल्ली-मुंबईचं अंतर 12 तासांवर येईल.
काय आहेत वैशिष्ट्ये
1 ) दिल्ली ते मुंबई एक्सप्रेस वे हा आठ पदरी एक्सेस कंट्रोल ग्रीन फिल्ड प्रोजेक्ट असून भविष्यात तो बारा पदरी करण्याची योजना आहे.
2) या महामार्गासाठी दिल्ली, हरीयाणा, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र अशा पाच राज्यात पंधरा हजार हेक्टर जमीन संपादीत केली
3) या महामार्गाच्या परिसरात 94 प्रवासी सुविधा तयार करण्यात येत आहेत. त्यामुळे वापरकर्त्यांना त्याचा लाभ होईल.
4) या महामार्गावर 40 हून अधिक इंटरचेंजेस असणार आहेत. त्यामुळे कोटा, इंदूर, जयपूर, भोपाळ, वडोदरा आणि सूरत येथील वाहन चालकांना कनेक्टीविटी मिळणार आहे.
5) सोहना ते दौसा हा पहिला टप्पा आहे
6) या प्रकल्पाचे सुरूवातीचे बजेट 2018 साली 98000 कोटी होते. त्यासाठी 12 लाख स्टीलचा वापर होणार आहे. त्यातून कोलकात्याच्या हावडा ब्रिज सारखे पन्नास ब्रिज उभारता येतील.
7) दिल्ली – मुंबई एक्सप्रेसमुळे दिल्ली ते मुंबईचे प्रवासाचे अंतरकमी होणार आहे.
8 ) दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावर अत्याधुनिक स्वयंचलित वाहतूक व्यवस्थापन यंत्रणा असेल.
9 ) प्राण्यांना जाण्यासाठी ओव्हरपास, अंडरपास असणारा हा भारतातील आणि आशियातील पहिला एक्सप्रेसवे आहे. रणथंबोर वन्यजीव अभयारण्यात प्राण्यांच्या अधिवासाची खास काळजी घेत त्याचे बांधकाम होत आहे.