वाढत्या लठ्ठपणावर देवेंद्र फडणवीस-राज ठाकरेंकडून भाष्य; म्हणाले, अर्बन लाईफस्टाईलमध्ये…

| Updated on: May 22, 2024 | 1:46 PM

Devendra Fadnavis and Raj Thackeray on Growing Obesity Problem : वाढत्या लठ्ठपणाच्या समस्येवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे काय म्हणाले? लठ्ठपणा कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे? वाचा सविस्तर...

वाढत्या लठ्ठपणावर देवेंद्र फडणवीस-राज ठाकरेंकडून भाष्य; म्हणाले, अर्बन लाईफस्टाईलमध्ये...
Mumbai Devendra Fadnavis and Raj Thackeray o
Follow us on

सध्या आपल्या जीवनशैलीत बराच बदल झाला आहे. बिझी लाईफस्टाईलमुळे लठ्ठपणाची समस्या वाढत चालली आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. जागतिक बाल लठ्ठपणा दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. लठ्ठपणा संदर्भात दोन प्रकार पाहायला मिळतात. अर्बन लाईफ स्टाईलमध्ये आणखी लठ्ठपणा वाढतोय. नरेंद्र मोदीजी यांनी सुरु केलेल्या आयुष्मान भारत योजनेचा यावर उपचार घ्यायला फायदा होतोय. या संदर्भात केंद्र सरकार देखील खूप उपाय योजना करत आहेत. लठ्ठपणा संदर्भात एक सर्व्हे झाला आणि याचे उपचार वाढले, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मैदानी खेळ खेळणं आवश्यक- फडणवीस

विशेष म्हणजे सरकारने प्रत्येक शाळेत दोन शिक्षक ट्रेन करायचे आणि विद्यार्थी यांच्यावर लक्ष ठेवून कॉन्सिलिंग करायची. देशात हा प्रोग्राम हातात घ्यायचं पूर्ण सुरु आहे. आता विशेषतः राज्य व केंद्र सरकारने पीटीचा तास अनिवार्य केले आहे. विना मैदानाची शाळा सुरु करता येणार नाही. अनेक मुलं मैदानात जात नाहीत, डिजिटल गेम खेळतात. त्यामुळे खेलो इंडिया सारखी मोहीम सुरु झालीय. राष्ट्रीय खेळात अनेक मुलांचं सहभाग वाढत आहे. पालकांना ही आता वाटतं खेळात मुलांचं करिअर होतंय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज ठाकरे काय म्हणाले?

वजन कसं कमी करायचं असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा राज ठाकरे यांनी त्यावर भाष्य केलंय. वजन कसं कमी करायचं हे मला कळलं असतं तर मी वजन कमी केलं नसतं का? गेम खेळ पाहिजेत. डॉक्टर माझ्या आयुष्यात आले. माझं वजन वाढू लागलं. मी रोज बॅडमिंटन खेळतो त्यातून 470 कॅलरी कमी होतात. त्यामुळे मी योग्य मार्गांवर आहे. लठ्ठपणा आजार आहे हे पालकांना कळायला मार्ग नाही. डॉक्टर तुम्ही यासाठी काही शोधलं पाहिजे. बाहेरचं फास्ट फूड आल्यावर हे सगळं वाढलंय. जिभेला वाईट ते चांगलं चांगलं ते वाईट असं झालंय, असं राज ठाकरेंनी म्हटलंय.

जपान मध्ये का कुठेतरी डब्बेच मुलांना आणू देत नाही. शाळेतच मुलांना जेवण बनवलं जातं, सर्व मिळून… शाळेतच चांगलं अन्न मिळालं तर कशाची गरज नाही. देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला जायचं आहे आणि मी पण चायनीजची ऑर्डर दिलीय… आम्ही निघतो अशी मिश्किल टिपण्णी राज ठाकरे यांनी केली.