मुंबई : मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरण आणि आर्यन खान प्रकरणाने आता वेगळं वळण घेतल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रकरणाचा तपास करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी खंडणी, लाचखोरी आणि बनावट कागदपत्राद्वारे नोकरी मिळवल्याचे गंभीर आरोप केले आहेत. इतकंच नाही तर समीर वानखेडे यांनी बॉलिवूडला बदनाम करण्याचा घाट घातल्याचा आरोपही केला जातोय. या आरोपांना समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर, तसंच बहीण यास्मिन वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलंय. (Actress Kranti Redkar Support to NCB officer Sameer Wankhede)
समीर वानखेडे फक्त कलाकारांना पकडत नाहीत. ते फक्त दोन-तीन टक्के आहेत. इतर अनेक गँगस्टर, ड्रग्स पेडलरलाही त्यांनी पकडलं आहे. ते कोणत्या पक्षासाठी काम करत नाहीत, ते न्यूट्रल आहेत, असं मत क्रांती रेडकर यांनी व्यक्त केलंय. त्याचबरोबर समीर वानखेडे यांना आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. लटकवू, जाळून टाकू, मारुन टाकू, अशा शब्दात आम्हाला धमक्या येत असल्याचा गंभीर आरोपही क्रांती रेडकर यांनी केला आहे.
त्यांच्या जीवाला धोका आहे. आम्हाला संरक्षण दिलं आहे. त्यामुळे सरकारचे आभारी आहोत. आमच्या कुटुंबाला धमकी दिली जात आहे. आमच्या जीवाला धोका आहे. आमच्याकडे कोणी पाहत असले तरी भीती वाटते. फेक अकाऊंटवरून आम्हाला धमकी दिली जात आहे. तुमची परेड करू, तुम्हाला जाळू अशा धमक्या दिल्या जात आहेत. आम्ही त्याचे स्क्रीनशॉट काढले असून वेळ आल्यानंतर ते जाहीर करू, असंही त्यांनी सांगितलं.
वानखेडे या प्रकरणातून बाहेर पडणारच. शेवटी सत्याचाच विजय होणार आहे. वेळच नवाब मलिकांना उत्तर देईल. अजूनही कटकारस्थान केले जातील. अनेक कागदपत्रं तयार केली जातील. त्यांना गोवण्याचा प्रयत्न केला जाईल. पण ती गोष्ट सिद्ध करणं सर्वात मोठी गोष्ट आहे. ते हे लोकं सिद्धच करू शकणार नाही. कारण हे सर्व खोटं आहे, असं त्यांनी सांगितलं.
तथ्यहीन आरोप केले जात आहे. ट्विटरवर कुणी काहीही लिहू शकतं. उद्या मी लिहिन. तर त्याचा अर्थ तो खरा आहे असं नाही. गावाचं, वानखेडे कुटुंबाचं सर्टिफिकेट पाहा कास्ट सर्टिफिकेट अख्ख्या गावाचं कसं खोटं असेल? रिसर्च जरा नीट करा. उद्यापासून मी बोलणार नाही, ही शेवटची पत्रकार परिषद आहे. सारखं सांगून कंटाळा आलाय. माझा नवरा खोटा नाही. आरोप कोर्टात नाहीत तर ट्विटरवर आहेत. आरोप कोर्टात सिद्ध झाले तर ते गुन्हेगार ठरतील. मीडिया ट्रायलमध्ये गुन्हेगार कसं सिद्ध होईल? 15 वर्षे क्लिन रेकॉर्ड असलेले अधिकारी आहेत. आमची कोट्यवधींची संपत्ती नाही. कोर्टात जाण्याइतके पैसे नाहीत. नाकातोंडात पाणी गेलं तर कोर्टात जाऊ, अशी प्रतिक्रिया क्रांती रेडकर यांनी व्यक्त केली आहे.
इतर बातम्या :
‘इंटरव्हलनंतर राऊत बोलणार असतील तर क्लायमेक्स मी करणार’, नितेश राणेंचा शिवसेनेला थेट इशारा
Actress Kranti Redkar Support to NCB officer Sameer Wankhede