आर्यन खानची आजची रात्रही कारागृहातच! जामीनाबाबत उद्याच्या सुनावणीत निर्णय होणार?

| Updated on: Oct 27, 2021 | 6:20 PM

आरोपींच्या वकिलांचा युक्तीवाद पूर्ण झाल्या असला तरी अद्याप एनसीबीच्या वकीलांचा युक्तीवाद बाकी आहे. मात्र, न्यायालयाची वेळ संपल्यानं या प्रकरणावर उद्या सुनावणी होणार आहे. त्यामुळे आर्यन खानला आजची रात्रही कारागृहातच काढावी लागण्याची शक्यता आहे.

आर्यन खानची आजची रात्रही कारागृहातच! जामीनाबाबत उद्याच्या सुनावणीत निर्णय होणार?
Aryan Khan
Follow us on

मुंबई : मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना आजची रात्री आर्थर रोड कारागृहातच काढावी लागणार आहे. कारण, या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीत आज आर्यन खानचे वकील मुकुल रोहतगी अरबाज मर्चंटचे वकील अमित देसाई आणि मुनमुनचे वकील अली कशिफ यांनी युक्तीवाद केला. आरोपींच्या वकिलांचा युक्तीवाद पूर्ण झाल्या असला तरी अद्याप एनसीबीच्या वकीलांचा युक्तीवाद बाकी आहे. मात्र, न्यायालयाची वेळ संपल्यानं या प्रकरणावर उद्या सुनावणी होणार आहे. त्यामुळे आर्यन खानला आजची रात्रही कारागृहातच काढावी लागण्याची शक्यता आहे. (Aryan Khan, Arbaaz Merchant and Moonmoon Dhamecha’s bail plea to be heard again tomorrow)

‘आरोपींच्या रक्ताची तपासणी का केली नाही?’

आज उच्च न्यायालयात झालेल्या युक्तीवादावेळी अरबाज मर्चंटचे वकील अमित देसाई यांनी एका मुद्द्यावर आक्षेप नोंदवला. रेव्ह पार्टी प्रकरणात आरोपींना पकडल्यानंतर एनसीबी कडून तातडीने त्यांची रक्त तपासणी करणं गरेजचं असतं. मात्र, या प्रकरणात एनसीबीने आरोपींच्या रक्ताची तपासणी केली नसल्याचा मुद्दा उच्च न्यायालयात उपस्थित केला. या प्रकरणातील दोन आरोपींना काल जामीन मंजूर झाला आहे. क्रुझ परत आल्यानंतर 4 ऑक्टोबरला एनसीबीकडून आरोपींना अटक करण्यात आली. एनसीबीने केलेल्या दाव्यानुसार अरबाज मर्चंटने जबाबात चरस बाळगल्याचं मान्य केलं आणि आर्यन खानसोबत त्याचं सेवन करण्यासाठी जात असल्याचंही मान्य केलं. पण, आता अरबाजने त्या जबाबापासून फारकत घेतली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या तुफान सिंह प्रकरणातील निवाड्यानुसार एनसीबी अधिकाऱ्यांसमोर दिलेला जबाब हा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही. तसंच दिलेल्या जबाबातही केवळ अमली पदार्थ सेवनाविषयी कपुली आहे. त्यामुळे फक्त तेच कलम लागू होतं. यात कट कारस्थानाचा भाग नसल्याचा युक्तीवाद देसाई यांनी केलाय.

मुनमुन धमेचाच्या वकिलांचा युक्तीवाद

कलम 29 चा गैरवापर हा केवळ माझ्या अशिला विरोधात नाही तर इतर आरोपींबद्दल केला गेला आहे. मुनमुनने कधीच ड्रग्जचं सेवन केलेलं नाही. माझ्या विरोधात दाखल केलेली केस ही बोगस आहे. आता एनसीबी म्हणत आहे की मुनमुन आणि ईश्मीत चढ्ढा यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट सापडले आहेत. हे संपूर्ण प्रकरण आता व्हॉट्सअॅप चॅटवर आधारित आहे. याशिवाय त्यांनी माझ्याकडे 5 ग्रॅम ड्रग्ज सापडल्याचा दावा केलाय. त्याचं प्रमाण फार कमी आहे. मुनमुन 28 वर्षांची तरुणी आहे आणि तिचा कोणाशीही संबंध नाही. तिला ड्रग्जची कोणतीही चिंता नाही. आता तिची वैद्यकीय तपासणी झाली तरी काहीच सापडणार नाही. एनसीबी तिचा संबंध किंवा कनेक्शन दाखवण्यात अपयशी ठरली आहे, असा युक्तीवाद मुनमुनचे वकील अली काशिफ यांनी केलाय.

‘क्रूझमधील 1300 लोकांना (क्रूझमध्ये) अटक केली पाहिजे’

त्याचबरोबर सोमिया सिंग आणि मुनमुनची वैयक्तिक झळती घेतली तेव्हा काहीही सापडले नाही. हा खटला सोमिया सिंग यांच्या विरोधात आहे. मुनमुनविरुद्ध नाही. सोमियाकडून रोलिंग पेपर धूम्रपान जप्त करण्यात आले. हे त्यांच्या स्वत:च्या दस्तऐवजात आहे. पण सोमिया आणि बलदेवयांना जाण्याची परवानगी होती. मुनमुनच्या नावावर जे ड्रग्ज आणले गेल्याचा आरोप आहे ते सिद्ध करण्यात ते अपयशी ठरले आहेत. जर त्यांना ते कोठून आले हे सापडले नाही, तर या प्रकरणात सर्व क्रूझमधील 1300 लोकांना (क्रूझमध्ये) अटक केली पाहिजे, असंही काशिफ म्हणाले.

इतर बातम्या :

इतिहास काढला तर लक्षात येईल ‘हमाम मे सब नंगे’, जितेंद्र आव्हाडांचा क्रांती रेडकरला सांभाळून बोलण्याचा सल्ला

दिन दिन दिवाळी… महाराष्ट्रातील शाळांना 14 दिवसांची सुट्टी जाहीर, शिक्षणमंत्र्यांकडून दिवाळीच्या शुभेच्छा

Aryan Khan, Arbaaz Merchant and Moonmoon Dhamecha’s bail plea to be heard again tomorrow