Vande Bharat: वंदे भारतसाठी गुड न्यूज, रेल्वेचा वेग वाढणार, प्रवासाचा कालावधी कमी होणार

| Updated on: Feb 26, 2024 | 7:16 AM

Vande Bharat Express Train | पश्चिम रेल्वे पायाभूत सुविधा आणि अभियांत्रिकी सुधारणा करत आहे. त्या सुधारणांचा अंतिम टप्पा आला आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर ट्रेनला 160 किमी प्रतितास वेगाने धावण्याची परवानगी मिळणार आहे.

Vande Bharat: वंदे भारतसाठी गुड न्यूज, रेल्वेचा वेग वाढणार, प्रवासाचा कालावधी कमी होणार
Vande bharat express
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

मुंबई, दि. 25 फेब्रुवारी 2024 | देशात लोकप्रिय ठरलेली वंदे भारत ट्रेनसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आली आहे. वंदे भारत एक्स्प्रेसचा वेग वाढणार आहे. मुंबई ते गांधीनगर वंदे भारत एक्स्प्रेस सुसाट धावणार आहे. यामुळे या प्रवासाचा वेळ 25 ते 30 मिनिटे कमी होणार आहे. तसेच मुंबईवरुन आणखी एक वंदे भारत ट्रेन सुरु होण्याची शक्यता आहे. सध्या देशभरातून 82 ठिकाणांवरुन वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाल्या आहेत. अनेक शहरांमधून या ट्रेन सुरु करण्याची मागणी होत आहे. या वर्षअखेर दोनशेपेक्षा जास्त ट्रेन सुरु होण्याची शक्यता आहे.

काय होणार बदल

मार्च 2024 पासून मुंबई आणि गांधीनगर दरम्यानच्या प्रवासाच्या वेळेत बचत होणार आहे. कारण पश्चिम रेल्वे पायाभूत सुविधा आणि अभियांत्रिकी सुधारणा करत आहे. त्या सुधारणांचा अंतिम टप्पा आला आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर ट्रेनला 160 किमी प्रतितास वेगाने धावण्याची परवानगी मिळणार आहे. सध्या 110 किमी वेगाने ही ट्रेन धावत आहे. परंतु लवकरच 160 किमी प्रतितास वेगाने वंदे भारत आणि शताब्दी ट्रेन धावणार आहे. सध्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर वंदे भारत ट्रेनला जवळपास 5.15 तास तर शताब्दी ट्रेनला 6.35 तास लागतात. वेग वाढल्यानंतर 30 मिनिटे कमी होणार आहे. सध्या विरार आणि चर्चगेट दरम्यान वंदे भारत 100-110 किमीप्रति तास वेगाने धावते. या गाडीचा वेग 160 किमी वाढल्यानंतर 30 मिनिटे वाचणार आहे.

मुंबईतून आणखी एक वंदे भारत

सध्या महाराष्ट्रातून 7 रेल्वे मार्गांवर वंदे भारत सुरू करण्यात आली आहे. राज्यातील मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते जालना, मुंबई ते गांधीनगर (अहमदाबाद), नागपूर ते बिलासपुर, इंदूर ते नागपूर आणि मुंबई ते गोवा या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. आता दक्षिण कन्नडचे खासदार नलिन कुमार कटील यांनी रेल्वे मंत्र्यांकडे नवीन मागणी केली आहे. त्यानुसार, मंगळुरू सेंट्रल ते मडगाव वंदे भारत एक्सप्रेस मुंबईपर्यंत नेण्याची विनंती केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही विनंती मान्य केल्यास मुंबईला आणखी एक वंदे भारत मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

हे ही वाचा

वंदे भारत ट्रेन विदेशातील रेल्वे ट्रॅकवरही धावणार, रेल्वे मंत्र्यांनी सांगितले कधीपासून निर्यात होणार