मुंबईत पावसाचं थैमान, जोगेश्वरीत महिला मॅनहॉलमध्ये पडली, कल्याणमध्ये वीज कोसळून 2 मजुरांचा मृत्यू

| Updated on: Sep 25, 2024 | 11:09 PM

मुंबईत मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. जोगेश्वरीत एक महिला मॅनहोलमध्ये पडली आहे. या महिलेच्या शोधासाठी अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. जवानांकडून युद्ध पातळीवर महिलेचा शोध सुरु आहे. तर कल्याणमध्ये वीस कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत पावसाचं थैमान, जोगेश्वरीत महिला मॅनहॉलमध्ये पडली, कल्याणमध्ये वीज कोसळून 2 मजुरांचा मृत्यू
मुंबईत पावसाचं थैमान, जोगेश्वरीत महिला मॅनहॉलमध्ये पडली
Follow us on

मुंबईत आलेल्या परतीच्या पावसाने शहरात अक्षरश: थैमान घातलं आहे. मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड आणि राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्याच्या घडीला मुसळधार पाऊस पडतोय. मुंबईत पावसामुळे जनजवीन पूर्णपणे विस्कळीत होताना दिसत आहे. अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल ट्रेन ठप्प झाली आहे. तर जोगेश्वरीतून एक हृदय हेलावणारी बातमी समोर येत आहे. जोगेश्वरीत मॅनहोलमध्ये एक महिला पडल्याची माहिती समोर येत आहे. जोगेश्वरीच्या सिप्झजवळ ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशामक दलाच्या जवानांकडून महिलेचा शोध घेतला जातोय.

मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट यामुळे कल्याणमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. कल्याण तालुक्यातील कांबा परिसरातील ही घटना घडली आहे. दगड खदाणीत काम करताना दोन कामागराचा वीज पडून मृत्यू झाला आहे. राजन यादव, बंदणा मुंडा अशी कामगारांची नावे आहेत. टिटवाळा पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू सुरु आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्ये रेल्वेची वाहतूक अजून देखील विस्कळीत आहे. सायन, कुर्ला, घाटकोपर परिसरात रेल्वे रुळावर पाणी साचलं आहे. सायन आणि कुर्ला रेल्वे स्थानकाच्या दरम्यान बराच वेळ लोकल ट्रेन थांबल्यामुळे अनेक महिला रेल्वेच्या डब्यातून उतरून पायी चालत गेल्या. यावेळी इतरांनीदेखील तोच पर्याय अवलंबला. कुर्ल्याला पोहचण्यासाठी अनेक प्रवासी रुळावरून चालत स्थानकाकडे जात आहेत.

हे सुद्धा वाचा

मुंबईत मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी भरलं आहे. पवई-जेवीएलआर रोडवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. दरम्यान, मुंबईतील पावसाचा मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडून कंट्रोल रूम मधून आढावा घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील कंट्रोल रूममधून आयुक्तांकडून ठिकठिकाणी पाऊस सुरू असल्याचा आढावा घेतला जात आहे.

मुंबईत आज (२५ सप्टेंबर २०२४) सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वाधिक पाऊस नोंदवण्यात आलेले केंद्र पुढीलप्रमाणे. (नोंद मिलिमीटरमध्ये)

  • पासपोली पवई महानगरपालिका शाळा (पवई) – २५७.८
  • मानखुर्द अग्निशमन केंद्र – २३९.६
  • एन विभाग कार्यालय- २३३.१
  • नूतन विद्यामंदिर – २३१.८
  • टागोर नगर महानगरपालिका शाळा (विक्रोळी) – २२७.६
  • हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर केंद्र, जोगेश्वरी – १८०
  • मरोळ अग्निशमन केंद्र- १५४.६
  • मालपा डोंगरी महानगरपालिका शाळा (अंधेरी) – १५०
  • शिवडी कोळीवाडा महानगरपालिका शाळा – १३९.२
  • के पूर्व विभाग कार्यालय – १२६.२
  • नाडकर्णी उद्यान महानगरपालिका शाळा – १२५.८
  • पी दक्षिण विभाग कार्यालय – १२३.९
  • प्रतीक्षानगर महानगरपालिका शाळा, शीव (सायन) – ११६.६
  • कुलाबा उदंचन केंद्र – ११४.३