मुंबई : मुंबई शहरासह पश्चिम उपनगरात पहाटेपासून मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून तुफान बॅटींग करणाऱ्या पावसाने मुंबईसह ठिकठिकाणी हजेरी लावली. यामुळे मुंबईतील हिंदमाता, परेल, सायन, किंग्ज सर्कल यासारख्या सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाण्यासह कोकणात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. (Mumbai Heavy Rain Maharashtra Weather Report warning issued by IMD)
मुंबईसह पश्चिम उपनगरात पहाटेपासून पावसाची संततधार पाहायला मिळत आहेत. मुंबईतील दादर, वरळी, लोअर परेल, मरिन ड्राईव्ह यासारख्या अनेक ठिकाणी पाऊस दिसत आहे. तर मुंबईच्या पश्चिम उपनगरात अंधेरी, बोरिवली, कांदिवली या ठिकाणीही मुसळधार पाऊस कोसळत आहे. पहाटेपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले आहे.
मुंबईतील हिंदमाता, परेल, सायन, किंग्ज सर्कल या सखल भागात नेहमीप्रमाणे पाणी साचले आहे. तर मुंबईच्या पश्चिम उपनगरात अंधेरी सबवे हा सखल भाग असल्यामुळे तिथे दोन ते तीन फूट पाणी साचले आहे. त्यामुळे अंधेरी सबवे वाहनांसाठी आणि नागरिकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
Maharashtra: Waterlogging reported in several areas of Mumbai as rain continues to lash the city; visuals from Andheri East pic.twitter.com/HGLiV3nhC8
— ANI (@ANI) June 11, 2021
संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा
दरम्यान पुढचे 3 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या तीन दिवसात कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर मुंबई, ठाण्यासह कोकणात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्याशिवाय नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये यलो अलर्ट घोषित केला आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
WEATHER INFO-
Nowcast warning issued at 0700 Hrs IST dated 11/06/2021 Moderate to intense spell of rain is likely to occur at isolated places in the district of Mumbai,Thane,Raigad during next 3 hours.
-IMD MUMBAIRainfall during past 15 minutes : pic.twitter.com/ScV75HXYrR
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) June 11, 2021
नवी मुंबईतही पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. रात्री नवी मुंबईत पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र, पहाटे पावसाचा जोर पुन्हा वाढला. त्यामुळे नवी मुंबईत पावसासह सर्वत्र धुके पसरलं आहे. नवी मुंबई, पनवेलमधील काही शहरात तुरळक पाऊस होत आहे. तर काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.
कोकणासह पुण्यात पावसाची विश्रांती
एकीकडे मुंबई, नवी मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर दुसरीकडे कोकण आणि पुण्यात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची एक सरही पडलेली नाही. आकाशात काळे ढग नसल्यामुळे सूर्यदर्शनही होत आहे. तर रायगड जिल्ह्यातही सध्या कुठेच फारसा पाऊस नाही. सावित्री, कुडंलिका, आबां, पातळगंगा, गाढी, उल्हास सर्व प्रमुख नद्या इशारा पातळीपेक्षा कमीने वाहत आहेत. (Mumbai heavy Rain Maharashtra Weather Report warning issued by IMD)
Maharashtra: Waterlogging in Mahim area of Mumbai as the city continues to receive rainfall pic.twitter.com/T4o3AohMYi
— ANI (@ANI) June 11, 2021
संबंधित बातम्या :
Mumbai Rain Live Updates | मुंबईत पहाटेपासून मुसळधार पाऊस, ऑरेंज अलर्ट जारी
Konkan Rain: हवामान खात्याचा रेड अलर्ट पण कोकणात पावसाची दडी, रत्नागिरीत रात्रीपासूनच एक सरही नाही
मुंबईतील साठलेल्या पाण्यातून चालणं जीवावर बेतू शकतं, बीएमसीकडून महत्त्वाच्या सूचना जारी