मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना अधीश बंगल्याला (Adhish Bungalow) प्राधिकरणाने नोटीस पाठवली होती. ही कारवाई चुकीची असल्याचं मत नारायण राणे यांचं आहे. त्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायायलात याचिका दाखल केली होती. त्यावरच्या सुनावणी दरम्यान प्राधिकरणाने दिलेली नोटिस योग्य त्यामुळे प्राधिकरणाकडेच दाद मागा, असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलंय.
नारायण राणे यांच्या याचिकेवर सुनावणी करताना प्राधिकरणाने दिलेली नोटिस योग्य त्यामुळे प्राधिकरणाकडेच दाद मागा, असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलंय. पण जर प्राधिकरणाचा निकाल नारायण राणेंच्या विरोधात निकाल दिला, तर त्यांना न्यायालयात दाद मागता येणार आहे, असं न्यायालयाने म्हटलंय. नोटीस बेकायदेशीर नाही, हे मात्र कोर्टाने अधोरेखित केलं आहे.
जुहूतील अधिश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम प्रकरणात नारायण राणे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाने त्यांना नोटीस बजावली आहे. याआधी नारायण राणे यांच्या जुहूतील बंगल्याला पालिकेनं नोटीस बजावली होती. मुंबई पालिकेनंतर मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयानंही नोटीस बजावली आहे. सीआरझेड उल्लंघन प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली होती. त्यामुळे राणे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
नारायण राणे यांचा मुंबईत अधिश नावाचा अलिशान बंगला आहे. मुंबईतील जुहूमधील तारा रोडवर हा बंगला आहे. या बंगल्याच्या निर्मितीवेळी अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. या बंगल्याच्या बांधकामांमुळे सीआरझेड नियमांचं उल्लंघन होत असल्याची आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी केली आहे. याआधीही त्यांनी मुंबई महापालिकेकडे तक्रार केली होती पण तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.