मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना अधीश बंगल्याला (Adhish Bungalow) प्राधिकरणाने नोटीस पाठवली होती. ही कारवाई चुकीची असल्याचं मत नारायण राणे यांचं आहे. त्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायायलात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी होणार आहे. मुंबई महापालिकेने कारवाईचे आदेश दिल्यानंतर नारायण राणेंनी हायकोर्टात धाव घेतली होती. त्यावर आज सुनावणी आहे.
नारायण राणे यांना अधीश बंगल्याला प्राधिकरणाने नोटीस पाठवली होती. ही कारवाई चुकीची असल्याचं मत नारायण राणे यांचं आहे. त्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायायलात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी होणार आहे. मुंबई महापालिकेने कारवाईचे आदेश दिल्यानंतर नारायण राणेंनी हायकोर्टात धाव घेतली होती. त्यावर आज सुनावणी आहे.
याआधीच्या सुनावणी दरम्यान प्राधिकरणाने दिलेली नोटिस योग्य त्यामुळे प्राधिकरणाकडेच दाद मागा, असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं होतं
नारायण राणे यांचा मुंबईत अधिश नावाचा अलिशान बंगला आहे. मुंबईतील जुहूमधील तारा रोडवर हा बंगला आहे. या बंगल्याच्या निर्मितीवेळी अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. या बंगल्याच्या बांधकामांमुळे सीआरझेड नियमांचं उल्लंघन होत असल्याची आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी केली आहे. याआधीही त्यांनी मुंबई महापालिकेकडे तक्रार केली होती पण तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण चिवला बीचवरील निलरत्न या बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात काही दिवसांपूर्वी देण्यात आले होते. भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र पोस्टल जीवन प्राधिकरणाला आदेश दिले होते.