खोदलेले रस्ते, तुंबलेले पाणी अन् ट्रॅफिक जाम; प्रवासाच्यादृष्टीने मुंबई जगातील सर्वात तणावग्रस्त शहर

| Updated on: Sep 05, 2021 | 7:15 AM

Transport In Mumbai | या सर्वेक्षणानुसार, बहुतांश चालकांनी स्टेअरिंग व्हीलवर असताना आपण तणावात असल्याचे किंवा आपल्याला राग आल्याची कबुली दिली. वाहतुकीच्यादृष्टीने जगातील प्रमुख शहरांचे मूल्यमापन करण्यात आले.

खोदलेले रस्ते, तुंबलेले पाणी अन् ट्रॅफिक जाम; प्रवासाच्यादृष्टीने मुंबई जगातील सर्वात तणावग्रस्त शहर
मुंबई वाहतूक
Follow us on

मुंबई: प्रचंड धावपळीच्या जीवनासाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबईचा वाहतुकीच्यादृष्टीने जगातील सर्वाधिक तणावग्रस्त शहरांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. पॅरिस, जकार्ता आणि दिल्ली या शहरांसह सर्वाधिक तणावग्रस्त शहर म्हणून मुंबईचा सर्वात वरचा क्रमांक लागतो. रोड सेफ्टी चॅरिटी ब्रेक.ओआरजी या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून नुकत्याच झालेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. (Road Transport and Traffic system in Mumbai city)

या सर्वेक्षणानुसार, बहुतांश चालकांनी स्टेअरिंग व्हीलवर असताना आपण तणावात असल्याचे किंवा आपल्याला राग आल्याची कबुली दिली. वाहतुकीच्यादृष्टीने जगातील प्रमुख शहरांचे मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये मुंबईला 7.4 गुण मिळाले. मुंबईत जगातील सर्वात व्यस्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. अनेक पायाभूत सुविधा असूनही याठिकाणी वाहन चालवणे हे सर्वात तणावपूर्ण असल्याचे निदर्शनास आले आहे.

मुंबई प्रवास करणं इतकं तणावपूर्ण का?

मुंबईत प्रत्येक चौरस किमी मध्ये 100,000 पेक्षा जास्त लोक आणि 510 कार प्रति किलोमीटर असल्याची बाब या सर्वेक्षणातून समोर आली आहे. मुंबईत सार्वजनिक वाहतुकीच्या आठ प्रकारच्या सुविधा आहेत. परंतु दाट लोकवस्तीमुळे मुंबईला रस्त्यांची गर्दी आणि अपघातांना सामोरे जावे लागते. त्यामुळे मुंबई हे देशातील प्रमुख शहर असूनही येथील प्रवास हा कटकटीचा आहे.

जगातील इतर शहरांची अवस्था?

तणावग्रस्त शहरांच्या सर्वेक्षणात 6.4 गुणांसह पॅरिसचा दुसरा क्रमांक लागतो. पॅरिसनंतर जकार्ता, दिल्ली आणि न्यूयॉर्क ही शहरं वाहतुकीच्यादृष्टीने सर्वात तणावपूर्ण आहेत.
* मुंबई, भारत – 7.4
* पॅरिस, फ्रान्स – 6.4
* जकार्ता
* इंडोनेशिया – 6.0
* दिल्ली, भारत – 5.9
* न्यूयॉर्क, युनायटेड स्टेट्स – 5.6

मुंबईत फ्लायओव्हरवरील गाड्यांच्या वेगमर्यादेत बदल

मुंबईत दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत चालली (highway flyover new speed limit) आहे. त्यामुळे रस्त्यावर अपघात होण्याच्या संख्येतही वाढ होत आहे. यामुळे मुंबई वाहतूक पोलिसांनी वेगमर्यादेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. दरम्यान आधीच्या वेगमर्यादेच्या तुलनेत मुंबईच्या प्रमुख रस्त्यांवरील वेगमर्यादा कमी करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी वेगमर्यादा वाढवण्यात आली (highway flyover new speed limit) आहे.

वेगमर्यादा बदलण्यात आलेले मुख्य मार्ग

1) नेताजी सुभाषचंद्र मार्ग – 65 Km h
2) वांद्रे वरळी सी लिंक – 80 Km h
3) पश्चिम द्रुतगती मार्ग – 70 Km h
4) पूर्व द्रुतगती मार्ग – 70 Km h
5) सायन पनवेल द्रुतगती मार्ग – 70 Km h
6) सांताक्रूझ चेंबूर लिंक (SCLR) रोड – 70 Km h
7) जे जे उड्डाण पूल – 60 Km h
8) ईस्टर्न फ्रीवे – 80 Km h
9) लालबाग उड्डाण पूल – 70 Km h
10) जगननाथ शंकर सेठ उड्डाण पूल दादर – 70 Km h
11) नानालाल उड्डाण पूल माटुंगा – 70 Km h

संबंधित बातम्या:

Mumbai Rain | मुसळधार पावसानं मुंबईकर हैराण, घरी जाताना तारांबळ

Mumbai Unlock: लॉकडाऊन उठताच मुंबईत ट्रॅफिक जॅम; रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुंबई वाहतूक पोलिसांचा मोठा निर्णय, फ्लायओव्हरवरील गाड्यांच्या वेगमर्यादेत बदल

(Road Transport and Traffic system in Mumbai city)