मुंबई : पावसात दरवर्षी मुंबई (Mumbai Rain) तुंबते. त्यामुळे अनेक स्टेशन, रेल्वे ट्रॅकही पाण्याखाली जातात. त्यामुळे नागरिकांना त्रास होतो. त्यावर मुंबई महापालिका आणि रेल्वेने उपाय शोदून काढला आहे. तुम्ही जर सायन,कुर्ला मार्गाने प्रवास करणार असाल तर तुम्हाला पाणी तुंबण्याचा समस्येचा सामना करावा लागणार नाही. पावसामुळे बंद होणाऱ्या मध्य रेल्वेला यंदा मोठा दिलासा मिळणार आहे. पालिका आणि रेल्वे प्रशासनाने रेल्वे रुळांवर ड्रेनेज बॉक्स (Drainage box) बसवण्याचं काम केलंय. ते पूर्णत्वास आलं आहे. ड्रेनेज बॉक्समध्ये जमा होणारं पाणी पंपाद्वारे मिठी नदीत सोडण्यात येणार आहे. यासाठी धारावी पिवळा बंगल्यापासून 400 मीटर लांब टी जंक्शनवर पंपिंग स्टेशन बांधण्यात येत असल्याचं अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितलं आहे.
तुम्ही जर सायन,कुर्ला मार्गाने प्रवास करणार असाल तर तुम्हाला पाणी तुंबण्याचा समस्येचा सामना करावा लागणार नाही. पावसामुळे बंद होणाऱ्या मध्य रेल्वेला यंदा मोठा दिलासा मिळणार आहे. पालिका आणि रेल्वे प्रशासनाने रेल्वे रुळांवर ड्रेनेज बॉक्स बसवण्याचं काम केलंय. ते पूर्णत्वास आलं आहे. ड्रेनेज बॉक्समध्ये जमा होणारं पाणी पंपाद्वारे मिठी नदीत सोडण्यात येणार आहे.
मुंबईत 18 व19 जून 2015 ला मुसळधार पाऊस झाला आणि मुंबईत पूरस्थिती निर्माण झाली होती. सायन पूर्वच्या मुख्याध्यापक भवन परिसर, गुरुनानक शाळा, धारावी धोबीघाट आणि सायन ते माटुंगा रेल्वे स्थानकामधील रेल्वे रुळांवर पाणी साचतं. पावसाळ्यात पाण्याचा निचरा जलदगतीने होणं आणि नागरिकांना पूरस्थितीमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी पर्जन्य जलवाहिनी विभागाने या परिसराची पाहणी होती. या पार्श्वभूमीवर पालिका उपाययोजना करत आहे.
धारावी पिवळा बंगला इथे पंपिंग स्टेशन बांधण्यास स्थानिक रहिवाशांनी विरोध केला त्यानंतर पिवळा बंगल्यापासून 400 मीटर लांब पंपिंग स्टेशन बांधण्याचं काम सुरू आहे. सायन, माटुंगा आणि कुर्ला स्टेशनदरम्यान रुळांवर ड्रेनेज बॉक्स बसवण्याचं काम सुरू आहे. ड्रेनेज बॉक्समध्ये जमा होणारं पावसाचं पाणी पंपाद्वारे मिठी नदीत सोडण्यात येणार आहे, अशी माहिती वेलरासू यांनी दिली आहे.